शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनावर चांगले संस्कार रुजवावेत

By admin | Updated: March 23, 2015 00:46 IST

मनोज अंबिके : कणकवली येथे ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ कार्यक्रमात मार्गदर्शन

कणकवली : पालक हे आपल्या पाल्याला संपूर्णपणे स्वातंत्र्य देत नाहीत. त्यांना अनेक बंधनांत अडकून ठेवतात. त्यामुळे पाल्याला आपले पालक हे हिटलर वाटतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांचे मित्र बनावे. त्याच्यामधील क्षमता ओळखून त्यांना योग्य दिशा दिली पाहिजे. पालकांनी पाल्यांच्या मनावर चांगल्या संस्कारांची रुजवण करावी, असे आवाहन मनोज अंबिके यांनी केले.एलआयसी आॅफ इंडियातर्फे कणकवली येथे ‘कानमंत्र आई- बाबांसाठी’ हा कार्यक्रम गुरुवारी आयोजिला होता. या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपपोलीस निरीक्षक जे. डी. भोमकर, अशोक करंबेळकर, श्रीनिवास पळसुले उपस्थित होते. अंबिके पुढे म्हणाले, अलीकडच्या काळात पालक व पाल्यांमध्ये संवाद होत नाही. त्यामुळे कुटुंबात अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत आहेत. यावर मात करायची असेल तर पालकांनी आपल्या पाल्याचे मित्र बनले पाहिजे. त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. यातून त्यांची विचार करण्याची पद्धत लक्षात येईल. पालक व पाल्यांमध्ये होणाऱ्या सुसंवादामुळे कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न व समस्या सुटतील असे त्यांनी सांगितले.पालक व पाल्यांमध्ये सुसंवाद होत नसल्यानेच त्यांची पावले वाईट मार्गाकडे वळतात. हे टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांसाठी दिवसातून काही वेळ द्यावा. जेणेकरून त्यांचे भावविश्व काय आहे याची कल्पना येईल. त्यांची विचार करण्याची क्षमता काय आहे हे समजून येईल. त्यांचे जर चुकीचे पाऊल पडत असेल तर त्यांना आपण रोखू शकतो. पालकांनी पाल्याला ज्या क्षेत्राची आवड आहे त्याच क्षेत्राचे ज्ञान द्यावे. त्यांच्यावर दबाव आणू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)++मनोज अंबिके यांनी या कार्यक्रमात उपस्थित पालकांशी थेट संवाद साधून आपल्या पाल्यांशी कसे वागावे याच्या टीप्स दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते. प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते; परंतु पालक हे आपल्या पाल्याने हेच केले पाहिजे याकरिता त्याच्यावर सातत्याने दबाव टाकत असतात. त्यामुळे ते पाल्य दबावाखाली असते. त्यामुळे या पाल्याला आपले पालक जणू हिटलरच आहेत असे वाटू लागते.अलिकडच्या काळात पालक आपल्या पाल्यांकडे लक्ष देत नाहीत ही बाब खूप गंभीर आहे.