शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

राज्यातील प्रत्येक शाळेत हॅप्पी सॅटर्डे; दीपक केसरकरांची माहिती

By अनंत खं.जाधव | Updated: February 14, 2024 16:57 IST

सावंतवाडीत राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन समारोप

सावंतवाडी : शालेय शिक्षण घेताना मुले खुश राहावीत यासाठी राज्यातील प्रत्येक शाळेत “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार असून या संकल्पने अंतर्गत मुलांना अभ्यास वगळून दर शनिवारी संगीत, नाट्य, कला यांचे शिक्षण तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.

ते  बुधवारी ५१ व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात मुंबई येथून ऑनलाईन बोलत होते.यावेळी एन.सी.आर.टी चे प्राध्यापक टी.पी शर्मा, राधा अतकरी,  प्रदीप कुडाळकर, वासुदेव नाईक, अच्युत भोसले, कल्पना बोडके,  म.ल. देसाई, कृष्णकुमार पाटील, डॉ. राजेंद्र कांबळे, राजकुमार अवसरे, प्रवीण राठोड,  प्रियांका देसाई, कैलास चव्हाण, अवधूत मालणकर, महेश चोथे, डॉ. आचरेकर, लक्ष्मीकांत बानते, जयंत भगत, प्रसाद महाले आदि उपस्थित होते.

 केसरकर म्हणाले, या ठिकाणी करण्यात आलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यांनी सादर केलेल्या प्रतिकृती कौतुकास्पद होत्या. विज्ञानाची कास धरून विद्यार्थ्यांनी यापुढे आपली वाटचाल करावी असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.यातून येथील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे काम शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि स्वतःच्या पायावर उभी राहावे हा त्यामागचा उद्देश आहे. येणाऱ्या काळात शासनाच्या माध्यमातून मुलांना शाळेबद्दल आकर्षण वाढावे यासाठी “हॅप्पी सॅटर्डे” ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेत अंतर्गत दर शनिवारी या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यास वगळून संगीत, नाट्य, कला आदी क्षेत्रातील प्रशिक्षण तज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून दिले जाणार आहे. 

आगामी काळात पहिली ते दहावी पर्यंत विद्यार्थ्यांना कृषी शिक्षण सक्तीचे करण्यात येणार आहे. अन्नधान्यात भारत देश स्वयंपूर्ण व्हावा हा उद्देश त्यामध्ये ठेवण्यात आला आहे. कोरोना काळात सर्व देश अन्नधान्याच्या बाबतीत कमी पडले. परंतु भारत देश केवळ शेतकऱ्यांमुळे अडचणीत आला नाही हे गौरवास्पद आहे. ही बाब लक्षात आल्यामुळे यापुढे कृषी हा विषय सक्तीचा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ही मंत्री केसरकर यांनी केले आहे.यावेळी संचालक कृष्णकुमार पाटील यांनी विद्यार्थ्याचे कौतुक करतानाच मुलांनी विज्ञान चे ज्या प्रकारे प्रदर्शन थाटले ते सर्वाना प्रेरणा देणारे असल्याचे ही पाटील यांनी सांगितले. हे विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वाचा यावेळी सत्कार करण्यात आला.