शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
2
“दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे उत्तर नाही, एअर स्ट्राइक करणे पर्याय असू शकत नाही”: राज ठाकरे
3
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे माझ्या आईसारख्या महिलांचा सन्मान; गणबोटे कुटुंबाने मानले मोदींचे आभार 
4
युद्धापूर्वीच पाकिस्तानचे आत्मसमर्पण, संरक्षण मंत्री म्हणाले- 'आम्ही कारवाई करणार नाही'
5
Operation Sindoor : अखेर न्याय झालाच! भारताने पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला; कोणी दिलं 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव?
6
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'नंतर काय काय घडलं? जगभरातून समर्थन...
7
'अभी पिक्चर बाकी है...', ऑपरेशन सिंदूरनंतर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची सूचक पोस्ट!
8
पीएम किसानचा २०वा हप्ता कधी येणार? तुमचं नाव यादीत आहे का? मोबाईलवरुनही तपासू शकता
9
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
10
'ऑपरेशन सिंदूर' हेच नाव का ठेवले गेले? काय आहे भारतीय संस्कृतीत सिंदूरचे महत्त्व? वाचा!
11
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
12
Operation Sindoor: कुख्यात दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबाचा खात्मा; १४ लोकांना यमसदनी धाडलं
13
आजोबा, वडील एक्स आर्मी, पतीही...! कोण आहेत 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देणाऱ्या लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी
14
Operation Sindoor: नऊ ठिकाणं... ९० दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचे कंबरडेच मोडले!
15
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
16
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
17
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
18
'ऑपरेशन सिंदूर'चा परिणाम! 'या' डिफेन्स स्टॉक्सने घेतली मोठी झेप; ३ महिन्यात नफा दुप्पट
19
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
20
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...

जिल्ह्यात हत्तींचा धुडगूस सुरुच

By admin | Updated: November 24, 2014 23:12 IST

नुकसानीचा पंचनामा : कुडाळ तालुक्यातील डिगसच्या दिशेने रवाना

सिंधुुदुर्गनगरी/कणकवली : वैभववाडी, कणकवली मागोमाग आता ओसरगावातही हत्तींनी थैमान मांडायला सुरुवात केली असून संपूर्ण परिसर भितीच्या छायेखाली वावरत आहे. तीन हत्तींचा एक कळप असून या हत्तींचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. दरम्यान, ओसरगांव कानसळीवाडी येथे हत्तींनी एका शेतकऱ्याची भाताची नासधूस केली आहे. दरम्यान, ओसरगांवातून हत्तींनी आपला मोर्चा कुडाळ तालुक्यातील डिगसच्या दिशेने वळवला आहे. त्या परिसरातही हत्तींनी नुकसान केल्याचे वृत्त आहे.परतीच्या वाटेवर असलेल्या जंगली हत्तींनी रविवारी रात्री ओसरगांव परिसरात नुकसान केले. या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून सभापतींनी सोमवारी या नुकसानीची पाहणी केली. कणकवली तालुक्यातून मालवण तालुक्यातील किर्लोसच्या दिशेने हत्तींना पिटाळण्यात आले होते. या हत्तींनी रविवारी रात्री ओसरगांव परिसरात नुकसान केले. भिवा मुकुंद पिळणकर यांच्या बागेतील नऊ माड हत्तींनी मोडून टाकले. पिळणकर यांचे २२ हजार ४०० रूपयांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच वनिता अंकुश सावंत यांच्या घरानजीक ठेवलेल्या बारा भाताच्या पोत्यांची नासाडी हत्तींनी केली. त्यांचे १० हजार ८०० रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा कृषी आणि वनविभागाने संयुक्तपणे पंचनामा केला. मंडळ कृषी अधिकारी आर.आर.गावकर, वनअधिकारी इंदुलकर, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर.राठोड, उपसरपंच सावंत, ग्रामसेवक आदी यावेळी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती आस्था सर्पे यांनी ओसरगांव परिसरात हत्तींनी केलेल्या नुकसानीची पाहणी केली. सध्या हत्तींचा वावर मानवी वस्तीत वाढला असून त्यांच्यावरील हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. हत्तींच्या हल्ल्यांमध्ये कित्येकजणांना आपला प्राण गमवावा लागला असून कित्येकजण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी या हत्तींचा बंदोबस्त करा अशाप्रकारच्या मागण्या निवेदनामार्फत प्रशासनाकडे केल्या आहेत. मात्र अद्यापही यावर ठोस उपाय न केल्याने हत्तींचा वावर आता माणगांव खोऱ्यातून ओसरगावच्या दिशेने वाढू लागला आहे. दोन दिवसांपूर्वीच वैभववाडी, कणकवली या पट्ट्यात हत्तींनी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता रविवारी रात्री ओसरगाव कानसळीवाडी येथे तीन हत्तींनी प्रवेश करत परिसर भयभीत करून सोडला आहे. हत्ती आल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, या हत्तींनी तेथीलच एका शेतकऱ्याच्या पडवीत ठेवलेल्या भाताची नासधूस केली आहे. हा प्रकार पाहण्यासाठी शेकडो ग्रामस्थ उपस्थितहोते. (प्रतिनिधी)हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणीजिल्ह्यात हत्तींचा मानवी वस्तीत वावर वाढला असून नागरिकांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. हत्तींचे वाढते हल्ले रोखण्यासाठी प्रशासनाने काही ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. हत्तीचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.वेताळबांबर्डेत ३५ माडांसह केळीचे नुकसानकुडाळ तालुक्यात हत्तींकडून शेती-बागायतीचे नुकसान सुरूच आहे. रविवारी रात्री हत्तींनी वेताळबांबर्डे येथील सुमारे ३० ते ३५ माडांसह केळी-बागायतीचीही नुकसानी केली. हत्तींनी वेताळबांबर्डे येथील भोगलेवाडी तसेच आजूबाजूच्या परिसरातील माडबागायतींची रविवारात्री नासधूस केली. यामध्ये तेथील रामचंंद्र गावडे यांचे १९ माड, रामा झोरे यांचे १६ माड तसेच रवींद्र बुधाजी गावडे यांच्या केळीच्या झाडांची नुकसानी केली. दरम्यान, हत्तींनी चालविलेल्या या नुकसानसत्रामुळे तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून लवकरात लवकर हत्ती हटाव मोहीम राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.