शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

गवस यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By admin | Updated: June 5, 2014 00:35 IST

उसप येथे मानवंदना : ‘शहीद गवस अमर रहे’च्या घोषणा कसई

दोडामार्ग : कारगिल येथे सेवा बजावताना शहीद झालेले दोडामार्ग येथील जवान रमेश महादेव गवस (वय ३६) यांचे पार्थिव बुधवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उसप येथे आणून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस आणि लष्कराच्यावतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद गवस यांना मानवंदना देण्यात आली. ‘शहीद गवस अमर रहे’ च्या घोषणांनी जनसमुदायाच्या उपस्थितीत वडील महादेव गवस यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. गवस यांच्या पार्थिवावरील तिरंगा वडिलांच्या स्वाधीन करण्यात आला. रमेश गवस यांचे पार्थिव कारगिल येथून मंगळवारी रात्री ९.३५ वाजण्याच्या सुमारास गोवा-वास्को येथे आणण्यात आले. तेथून पणजी येथील सेक्शन हेड कोट व बुधवारी सकाळी ८.३० वाजता सुभेदार रमेश राऊळ, निदेश राऊळ व सहकारी जवानांनी पार्थिव गवस यांच्या गावी उसप येथे आणण्यात आणले. यावेळी गवस कुटुंबियांच्या आक्रोशाने उपस्थितांचे हृदय हेलावून गेले. त्यानंतर पार्थिवाला तिरंगा परिधान करून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेण्यात आले. गवस यांच्या पार्थिवावर सुभेदार, पोलीस अधिकारी, तहसीलदार, माजी सैनिक आणि सहकार्‍यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर जवान आणि पोलिसांनी बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना दिली. पाच मिनिटांच्या शोकसभेनंतर गवस यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला. शहीद गवस यांचा मृतदेह उसप येथे आणल्यानंतर उसप ग्रामस्थांसह तालुकावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. उसपमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. पवार, एस. आर. बोबके, प्रभारी गटविकास अधिकारी प्रशांत चव्हाण, माजी सैनिक पतसंस्था दोडामार्गचे रमेश दळवी, उसप सरपंच लक्ष्मण नाईक, गोपाळ गवस, सूर्यकांत परमेकर, फटी गवस, पांडुरंग गवस, महादेव नाईक, सैनिक पतसंस्था सावंतवाडीचे अध्यक्ष दीनानाथ सावंत, सचिव सुभाष सावंत, सैनिकी मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक शांताराम चव्हाण, सुभेदार रमेश राऊळ, निदेश राऊळ, निवृत्त कर्नल सुहास नाईक, कल्याण संघटक रमेश आईर, सुरेश गावडे, वासुदेव राऊळ, विठोबा देसाई, मनोहर राणे, नारायण दळवी, अनिल गवस, मोहन नाईक, लक्ष्मण गवस, दीपक गवस, धनंजय गवस, नरेश गवस आदी उपस्थित होते. (वार्ताहर)