शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी वाळू, दगड उत्खनन पुन्हा सुरू करून दाखवावे

By admin | Updated: May 14, 2015 23:58 IST

प्रसाद मोरजकर : मालवण पंचायत समिती सभेत सदस्याने दिले शिवसेनेला आव्हान

मालवण : युतीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात प्रशासनाकडून वाळू व्यावसायिकांवर नाहक कारवाई करण्याचे प्रमाण वाढले आहे. आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे पालकमंत्री असताना जिल्ह्यात वाळू आणि काळ्या दगडाचे उत्खनन सुरळीत होत होते. वाळू-दगड व्यावसायिकांवर होणारा अन्याय दूर होणे आवश्यक असून, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात धमक असल्यास त्यांनी पूर्वीप्रमाणे वाळू व काळा दगड उत्खनन सुरु करून दाखवावे, असे आव्हान पंचायत समिती सदस्य प्रसाद मोरजकर यांनी पंचायत समिती मासिक सभेत बोलताना दिले.मालवण पंचायत समितीची मासिक सभा सभापती सीमा परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पंचायत समिती सभागृहात पार पडली. यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सदस्य प्रसाद मोरजकर, संजय ठाकूर, उदय दुखंडे, राजेंद्र प्रभुदेसाई, श्रद्धा केळुसकर, सुजला तांबे, हिमाली अमरे व अधिकारीवर्ग उपस्थित होता.यावेळी प्रसाद मोरजकर म्हणाले, जिल्ह्यातील वाळू प्रश्न पेटलेला असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. केसरकर पालकमंत्री झाल्यापासून प्रशासनाकडून वाळू वाहतूक करणारे डंपर पकडणे, होड्या सील करणे तसेच वाळू व्यावसायिकांकडून ६० हजार रुपयांपर्यंत अवाजवी दंड आकारणे असे प्रकार सुरु झाले. नारायण राणे पालकमंत्री असताना वाळू व्यावसायिकांवर असा अन्याय होत नव्हता, असेही मोरजकर म्हणाले.यावेळी उपसभापती देवानंद चिंदरकर यांनी गोवा येथील पर्ससीन मच्छिमार व मालवणातील पारंपरिक मच्छिमार यांच्यातील वादावर सामंजस्याने तोडगा काढणे गरजेचे असल्याचे सांगत यासाठी गोवा व महाराष्ट्र सरकारने योग्य ती भूमिका घ्यावी, असे सांगितले. तसेच दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात झाडे पडून वीज पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी महावितरण कंपनीने कोणती उपाययोजना केली आहे, असा सवाल वीज अभियंत्यांना चिंदरकर यांनी केला. यावर वीज वाहिन्यांवर आलेली झाडे तोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे असे वीज अभियंत्यांनी सांगितले. यावेळी संजय ठाकूर यांनी वीज वाहिन्यांवरील झाडे तोडण्यासाठी वीज कर्मचारी पैसे मागतात, असा आरोप केला. हा आरोप चुकीचा असल्याचे वीज अभियंत्यांनी सांगून अशा प्रकारे कोण पैसे मागत असतील तर त्यांची नावे द्यावीत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पी. ए. बोटलवार यांचा सत्कारमहावितरणचे आचरा उपविभाग अभियंता पी. ए. बोटलवार हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पंचायत समितीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर व सभापती सीमा परुळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन बोटलवार यांना सन्मानित करण्यात आले.