शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री निष्क्रिय ठरले

By admin | Updated: April 8, 2016 23:56 IST

परशुराम उपरकर यांचा आरोप : सत्ताधाऱ्यांचेच अधिकारी ऐकत नसल्याची खंत

मालवण : काँग्रेसला धुडकावून लावत केंद्रात आणि राज्यात युतीचे शासन आहे. कोकणा-तील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, तेच सत्ताधारी जनतेची दिशाभूल करत आहेत. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवताना आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण सत्ताधाऱ्यांत रंगले आहे. आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी अधिकारी करत नाही, असे विधानसभेत सांगण्याची वेळ सत्ताधारी शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर येते याचाच अर्थ त्यांच्या पक्षाचे पालकमंत्री निष्क्रिय बनले आहेत, असा आरोप करत, माजी आमदार मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी शिवसेनेवर प्रहार केला. दरम्यान, मालवण आनंदव्हाळ-कसाल या मुख्य रस्त्याच्या कोट्यवधी रुपयांच्या डांबरीकरण कामात वापरण्यात आलेल्या साहित्याची प्रयोगशाळेत तपासणी केली. या तपासणीत २७ टक्के डांबर प्रमाण कमी असण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशा प्रकारे सर्वच रस्त्याच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून, जनतेच्या पैशांचा डल्ला मारण्याचे काम हे सरकार व ठेकेदार मंडळी करत आहेत असे सांगत याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी करणार असल्याचे उपरकर यांनी मालवण शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष गणेश वाईरकर, शैलेश अंधारी, भिवा शिरोडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. उपरकर म्हणाले, मालवण आनंदव्हाळ-कसाल या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्त्याच्या कामात वापरलेल्या साहित्याचे नमुने घेत ते मनसेच्यावतीने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. खासगी प्रयोगशाळेत केलेल्या साहित्याच्या तपासणीत प्रत्यक्षात ३.५ एवढ्या प्रमाणात डांबराचा वापर करणे आवश्यक असताना प्रत्यक्षात २.५६ एवढेच डांबर म्हणजे सुमारे २७ टक्के डांबर कमी वापरण्यात आले असल्याचे दिसून आले. पाटबंधाऱ्यांच्या कामांना निधी नाही, वन संज्ञाप्रश्न ते सोडवू शकले नाहीत. विरोधी पक्षांना जे प्रश्न मांडायला हवेत, तेच प्रश्न मांडण्याची वेळ सत्तेतील आमदारांवर आली. आरोग्याचा प्रश्न अधांतरीच राहिला असून, जिल्ह्यातील आंबा नुकसान भरपाईचीही दाखल या अधिवेशनात घेण्यात आली नाही. जिल्ह्याचे पालकमंत्री कोटीच्या विकासाच्या घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात त्या योजना अधिकारी वर्गाला माहीतच नसतात. त्यामुळे जनतेची फसवणूक केली जात आहे. (प्रतिनिधी)कोकणातील जनतेचा भ्रमनिरासकाँग्रेसने जिल्ह्याचे वाटोळे केले. त्यानंतर सत्तेत एकत्र आलेले शिवसेना-भाजप एकमेकांच्या विरोधात शत-प्रतिशत सांगत असून, दुसरीकडे जनतेचा भ्रमनिरास करत आहेत. काँग्रेसला धुडकावून कोकणातील जनतेने ज्या शिवसेना-भाजपला सत्ता दिली, त्यांनीच कोकणातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवण्याचे काम केले आहे, असा आरोपही उपरकर यांनी केला आहे.