शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

होमगार्डना हवी सेवेची हमी

By admin | Updated: December 5, 2014 23:17 IST

आज नागरी संरक्षण दिन : पोलिसांसारखीच सेवा मात्र लाभ नाही

मिलिंद पारकर - कणकवली -नागरी संरक्षणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या, आवश्यक त्या वेळी उपलब्ध होणाऱ्या होमगार्डना कोणत्याही वेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचारण केले जाते. मात्र, पोलिसांसारखेच प्रशिक्षण घेऊन त्यांच्यासारखीच सेवा बजावणाऱ्या होमगार्डना इतर वेळी कोणताही लाभ मिळत नाही. पोलीस विभागात सध्या रिक्त पदांनी ताण येत आहे. बंद, संप, मोर्चा आणि इतर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रसंगात होमगार्डना पाचारण केले जाते. त्यामुळे पोलीस यंत्रणेचा ताण काही प्रमाणात कमी होतो. हव्या त्या वेळी उपलब्ध होणाऱ्या होमगार्डना मात्र पोलिसांसारख्या सुविधा मिळत नाहीत. त्यांना दैनंदिन भत्त्यावर फक्त अवलंबून रहावे लागत आहे. स्वयंसेवकासारखी ही सेवा असली तरी होमगार्डना शासनाकडून काही बाबतीत हमी हवी आहे. जिल्ह्यातील होमगार्ड प्रथमोपचार, अग्निशमन, शस्त्रप्रशिक्षणासह सज्ज आहेत. होमगार्ड होण्यासाठी १६ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर, त्यानंतर घाटकोपर येथे पुढील प्रशिक्षण दिले जाते. तीन वर्षांचे प्रशिक्षण घेऊन होमगार्ड नागरी संरक्षणासाठी आवश्यक त्या वेळी हजर होतात. मात्र, इतर वेळी त्यांना आर्थिक वा इतर लाभ मिळत नाहीत. जिल्ह्यात एकंदर पोलीस बळ गरजेपेक्षा कमी आहे. तालुक्याच्या ठिकाणची पोलीस स्थानके आणि दूरक्षेत्रे अशा ठिकाणी होमगार्डना महिन्यातून किमान पंधरा दिवस सेवा मिळावी, अशी होमगार्डची अपेक्षा आहे. होमगार्डना एप्रिलपासून दिवशी ४०० रूपये भत्ता सुरू करण्यात आला आहे. त्यापूर्वी हा भत्ता १७५ रूपये इतका होता. त्यामध्ये २५ रूपये आहारभत्ता आणि १५० रूपये सेवा भत्त्याचा समावेश होता. मात्र, आताही प्रवासासाठी वॉरंट किंवा प्रवास भत्ता मिळत नाही. त्यामुळे घरापासून लांब जाताना प्रवास खर्च भत्त्यामधूनच करावा लागतो. अशा अनेक समस्यांनी होमगार्ड त्रस्त आहेत. त्यामुळे होमगार्ड समाधान मिळत नाही.फायदे मिळणे गरजेचेसर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतलेल्या होमगार्डना सेवेच्या दिवशी मिळणाऱ्या भत्त्याव्यतिरीक्त कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. आवश्यक त्या वेळी सेवेसाठी हजर होणाऱ्या होमगार्डना महिन्यातून किमान पंधरा दिवस काम मिळावे. सेवेतून निवृत्त होताना होमगार्डना काही फायदे मिळणे गरजेचे आहे.- व्ही. जी. पावसकर,कणकवली तालुका प्रभारी समादेशक मागण्या अनेक, ठोस कार्यवाही नाहीजिल्ह्यात सध्या ४०० होमगार्ड आहेत. त्यापैकी ३०० पुरूष तर १०० महिला सदस्य आहेत. काही होमगार्डस् तर २० वर्षांहून अधिक काळ सेवेत आहेत. स्वयंसेवी काम असले तरी होमगार्ड सेवेकडे युवकांनी वळावे यासाठी शासनाने काही सुविधा देण्याची अपेक्षा असते.शासनाकडे होमगार्ड संघटनेकडून मागण्याही करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप त्याच्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही.