शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘जपून घे झोका गं’तून मुलींना मार्गदर्शन

By admin | Updated: August 17, 2016 23:11 IST

बांदा येथे कार्यक्रम : अस्मिता गु्रपचा पुढाकार, प्रतिसाद अ‍ॅपचे दाखविले प्रात्यक्षिक

बांदा : समाजात दैनंदिन जीवनात वावरताना महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे महिला, मुलींनी समाजात सार्वजनिक ठिकाणी वावरताना कोणती काळजी घ्यावी व जागरुकता कशी बाळगावी, याबाबत बांदा पोलिस ठाण्याच्या सहकार्याने मार्गदर्शन करण्यात आले. अस्मिता गु्रपच्या महिलांनी ‘जपून घे झोका गं’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बांदा बसस्थानक येथे महाविद्यालयीन मुलींबरोबरच पालक व ग्रामस्थ यांना धडे दिले.यावेळी पोलिस सहाय्यक निरीक्षक प्रदीप गीते व पोलिस कर्मचारी यांनी महिलांवरील अत्याचाराबाबतचे विविध गुन्हे व त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कलमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी महिला व मुलींच्या मोबाईलमध्ये ‘प्रतिसाद अ‍ॅप’ कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक दाखविले.मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने समाजात जनजागृतीच्या माध्यमातून अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची संकल्पना प्रदीप गीते यांनी मांडली. त्यासाठी अस्मिता गु्रपच्या महिलांची मदत घेतली. गु्रपच्या प्रमुख रुपाली शिरसाट यांनी कार्यक्रमाचा उद्देश व महिला व मुलींनी कोणती काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. नाबर स्कूलच्या शिक्षिका रिना मोरजकर यांनी मुलींनी अत्याचाराच्या घटना घडू नयेत म्हणून काय करावे याबाबत मार्गदर्शन केले. लक्ष्मी सावंत, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, अरुणा सावंत यांनीदेखील मार्गदर्शन केले. प्रदीप गीते म्हणाले, कायद्यात महिलांच्या छेडछाडीबाबत कडक कायदे असतानाही अत्याचारांच्या घटना या वाढत्याच आहेत. महिला किंवा मुलीला एखाद्या सार्वजनिक ठिकाणी छेडछाडीची घटना घडल्यास ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा. यासाठी पोलिस खात्याने ‘प्र्रतिसाद अ‍ॅप’ची निर्मिती केली आहे. यावेळी महिला पोलिस कर्मचारी सारिका बांदेकर, स्मिता डिसोजा यांनी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी सरपंच मंदार कल्याणकर, उपसरपंच बाळा आकेरकर, माजी सरपंच शितल राऊळ, सनी काणेकर, सुधीर शिरसाट, राजेश गोवेकर, राकेश विर्नोडकर, प्रियांका नाईक, अस्मिता गुु्रपच्या रिमा गोवेकर, मनाली नाईक, सुवर्णलता धारगळकर, प्राची नार्वेकर, श्रेया कोरगावकर, जानकी नाईक, जयश्री कुबडे आदी महिलांसह विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)