शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

अधीक्षकांकडून रक्कम मिळण्याची हमी

By admin | Updated: November 6, 2015 23:36 IST

कोनाळकट्टा पोस्ट अपहारप्रकरण : ठेवी मिळण्यासाठी दुसऱ्या दिवशीही खातेदारांची गर्दी

दोडामार्ग / कसई दोडामार्ग : तालुक्यातील कोनाळकट्टा येथील पोस्ट कार्यालयात झालेल्या अपहार प्रकरणी शुक्रवारी खातेदारांनी पोस्ट कार्यालयात एकच गर्दी केली. आपले पैसे लागलीच मिळावेत, यासाठी सहाय्यक अधीक्षक अर्जुन इंगळे यांना खातेदारांनी घेराव घातला. शेकडो खातेदारांच्या उपस्थितीने इंगळे गोंधळून गेले. खातेदार आपली रक्कम मिळणार की नाही, या शंकेने भांबावून गेले. सर्व खातेदारांचे पैसे देण्यासाठी कार्यवाही करण्याचे आश्वासन इंगळे यांनी दिल्यानंतर खातेदार शांत झाले. कोनाळकट्टा येथील पोस्ट कार्यालयात खातेदारांमार्फत जमा विविध योजनांच्या रकमेचा अपहार झाला आहे. हे कळताच खातेदारांनी पोस्ट कार्यालयात धाव घेतली. येथील पोस्ट कर्मचारी सुरेश बांदेकर हे गायब झाल्याने या प्रकरणाला वेगळीच दिशा मिळाली. पोस्ट कार्यालयात झालेल्या या गोंधळामुळे सावंतवाडीतील सहाय्यक डाक अधीक्षक अर्जुन इंगळे यांनी गुरूवारी घटनास्थळी धाव घेतली होती. काबाडकष्ट करून पोस्टात जमविलेल्या रकमेचा अपहार झाल्याने खातेदारांनी इंगळे यांच्यासमोर अश्रूंचा बांध रिकामा केला होता. उपस्थित खातेदारांनी आक्रमक होत आपली रक्कम ताबडतोब मिळण्यासाठी इंगळे यांना घेराव घातला. इंगळे यांनी सर्वांची रक्कम पूर्ण परताव्यानिशी देण्याचे अभिवचन दिले होते. दरम्यान, शुक्रवारी पोस्टातील ठेवीदार, खातेदारांनी कार्यालयात एकच गर्दी केली. कार्यालयात आढावा घेण्यासाठी आलेल्या डाक अधीक्षकांना दुसऱ्या दिवशीही घेराव घातला. शेकडो खातेदारांनी आपली रक्कम ताबडतोब मिळण्यासाठी एकच आग्रह धरला. यावेळी इंगळे यांनी खातेदारांना सबुरीचा सल्ला दिला. तर उपस्थितांनी आमच्या घामाच्या रकमेवर डल्ला मारता मग विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न केला. इंगळे यांनी खातेदारांचे सर्व रक्कम व्याजासहीत परत केली जाईल असे ठामपणे सांगितले, त्यासाठी अगोदर कागदपत्रांची तपासणी करू द्या, अशी विनंती केली. यावर खातेदारही काही काळ शांत झाले. पण कार्यालयाच्या बाहेरची गर्दी कमी झाली नाही. दरम्यान, सायंकाळी ओरोस येथील अधीक्षक भोसले यांनी कोनाळकट्टा कार्यालयाला भेट देऊन माहीती घेतली. याची माहिती मिळताच खातेदारांनी कार्यालयात पुन्हा धाव घेत भोसले यांच्याकडेही आमच्या ठेवींची रक्कम ताबडतोब द्या, अशी मागणी करत त्यांनाही घेराव घातला. (प्रतिनिधी)  

अपहार झालेले खातेदार : शुक्रवारी पुन्हा भर पडली ४दरम्यान गुरूवारी झालेल्या अपहार नोंदीतील खातेदारांशिवाय आज पुन्हा यामध्ये भर पडली आहे. यामध्ये आशुमती गवस (४० हजार), प्रतिमा भट (२ लाख), रमेश गवस (९८ हजार), कमल राजाराम जाधव (४५ हजार), सुनिता दिवाकर नाईक वायंगणतड (२ लाख ५० हजार), प्रकाशिनी प्रकाश तावडे (तिराळी) (१६ हजार), आबाराव लोंढे (३ लाख), अनिल गवस (१ लाख), रामकृष्ण मणेरीकर (१ लाख ५० हजार), प्रसाद तिळवे (१६ हजार), गंगाराम पांगम (१ लाख ८७ हजार) यांचा समावेश आहे.