शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात युतीच्या सदस्यांनी केला गट

By admin | Updated: November 6, 2015 23:37 IST

जिल्हाधिकाऱ्यांची भेट : नगरपंचायतीतील फोडाफोडाच्या राजकारणाला पूर्ण विराम

सिंधुदुर्गनगरी : दोडामार्ग नगरपंचायतीसाठी शुक्रवारी शिवसेना व भाजप यांनी राजकीयदृष्ट्या सावध भूमिका घेत आपल्या प्रत्येकी पाच सदस्य गटाची स्थापना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासमोर केली. त्यामुुळे उमेदवार फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम मिळाला आहे. नवनिर्वाचित दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये १७ जागांपैकी शिवसेना ५, भाजप ५, काँगे्रस ४, राष्ट्रवादी २ व मनसे १ असे उमेदवार निवडून आले आहेत. सतरा जागांपैकी दोन तृतीयांश संख्याबळ सत्ता स्थापनेसाठी मिळविण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच सत्ता स्थापनेसाठी फ ोडाफोडीचे राजकारण होऊ नये, म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. यातूनच आज शिवसेनेच्या पाच सदस्यीय गटाची स्थापना करण्यात आली. या गटामध्ये गटनेते म्हणून संतोष विश्राम म्हावळंकर, संध्या राजेश प्रसादी, दिवाकर लवू गवस, लीना महादेव कुबल व सुषमा लवू मिरकर यांचा समावेश आहे. यावेळी दोडामार्गचे शिवसेना तालुकाध्यक्ष बाबुराव धुरी, जिल्हा बँक संचालक प्रकाश परब, गणेश गवस, अ‍ॅड. भूषण कुबल, लवू मिरकर, महादेव कुबल आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजपानेही सावध पवित्रा घेत पाच सदस्यीय गटाची स्थापना केली. यामध्ये गटनेता म्हणून चेतन सुभाष चव्हाण, वैष्णवी विष्णू रेडकर, प्रमोद बाबू कोळेकर, रेश्मा उद्देश कोरगावकर व सुधीर सुरेश पनवेलकर यांचा समावेश आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. या दोन्ही गटस्थापनेमुळे शिवसेना व भाजप युतीची सत्ता दोडामार्ग नगरपंचायतीवर होईल, अशी जवळजवळ खात्री झाली आहे. सध्याची फोडाफोडीच्या राजकारणाची परिस्थिती पाहता त्यांनी घेतलेला हा सावध पवित्रा समजूतदार राजकारण दाखवतो. याच नगरपंचायतीत काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. या दोघांची आघाडी झाली, तरी अपेक्षित संख्याबळ ते आता मिळवू शकत नाहीत. मनसेचा एक नगरसेवक जरी आघाडीने मिळविला, तरी त्यांचे संख्याबळ सातवरच थांबते. त्यामुळे दोडामार्ग नगरपंचायतीत शिवसेना व भाजप पक्षाची युतीची सत्ता येणार, हे निश्चित झाले आहे. (प्रतिनिधी)