शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

तहानलेल्या ३५ गावांना ‘ग्रॅव्हिटी’ने पाणी देणार

By admin | Updated: October 27, 2015 00:12 IST

रवींद्र वायकर : जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून योजनेचा सर्व्हे

चिपळूण : कोळकेवाडी धरणातून वीजनिर्मिती झाल्यानंतर वाशिष्ठी नदीत पाणी सोडले जाते. यातील काही पाणी खेड, चिपळूण तालुक्यातील ३५ गावांना ग्रॅव्हिटीने देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, या गावांचा सर्व्हे करण्यासाठी ५० लाखांचा निधी मंजूर आहे. ही एक नाविन्यपूर्ण योजना राबविली जाणार असल्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज (सोमवारी) येथे सांगितले.जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून या योजनेचा सर्व्हे केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १५ गावांना ग्रॅव्हिटीने पाणीपुरवठा होणार आहे. उर्वरित गावांना पुढील टप्प्यात पाणी दिले जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तहानलेल्या गावांना कमी खर्चात शुद्ध पाणी मिळणार आहे. नळपाणी योजना राबवण्यासाठी प्रत्येक गावाचा सर्व्हे केला जाणार आहे. याबाबतची सूचना जीवन प्राधिकरणला देण्यात आली आहे. भविष्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी देण्याचा आपला प्रयत्न असेल, असे वायकर यांनी सांगितले.नगर परिषदेतर्फे वाशिष्ठी नदीकिनारी जुन्या बाजार पुलानजीक नवीन पूल बांधण्याचे काम सुरु असून, या कामासाठी मंजूर झालेला निधी अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. हा निधी लवकरात लवकर मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी व्यक्त केली. विकासाच्या दृष्टीने होणाऱ्या कामांना चालना मिळावी. याकरिता आपण मंजूर निधी मिळविण्यासाठी नगर परिषदेला आवश्यक ते सहकार्य करु, असे आश्वासन पालकमंत्री वायकर यांनी दिले. (वार्ताहर)सोसायटी निर्माण करणारशहर परिसरात जागा उपलब्ध झाल्यास म्हाडाच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायटी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. सर्वसामान्यांना बँकेकडून कर्ज सुविधा देण्याचाही आपला प्रयत्न आहे. पोलिसांसाठीही स्वत:चे घरकुल कसे उभे राहील, यासाठीही शासन स्तरावरुन लक्ष दिले जाणार असल्याचे रवींद्र वायकर यांनी सांगितले.कदमांचा समाचारमाजी उपजिल्हाप्रमुख दादा कदम यांना पक्षशिस्त कळलेली नाही. त्यामुळे ते आरोप करीत आहेत, असे वायकर यावेळी म्हणाले. पर्यटन विकास योजनेंतर्गत ६७० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ७५ कोटीपैकी ५० कोटी निधी मंजूर आहे. गणपतीपुळे, रत्नागिरी, गुहागर येथील पर्यटनस्थळे विकसित केली जाणार आहेत, असे ते यावेळी म्हणाले.