शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ग्रामसेवकांचा जिल्हाधिकारी भवनावर मोर्चामागण्यांचे निवेदन :

By admin | Updated: July 1, 2014 00:27 IST

...अन्यथा २ जुलैपासून काम बंद आंदोलनाचा दिला इशारा

सिंधुदुर्गनगरी : ग्रामसेवकांना स्वतंत्र वेतनश्रेणी मंजूर करा, ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे यासह प्रलंबित दहा मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी भवनावर मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा दिल्यामुळे सिंधुदुर्गनगरी परिसर दणाणून गेला होता. प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य करा अन्यथा २ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारू असा कडक इशाराही जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सोमवारी दुपारी रखरखत्या उन्हात शेकडो ग्रामसेवकांनी ओरोस येथील रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी भवन असा मोर्चा काढला. युनियनचे अध्यक्ष सूर्यकांत वारंग यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात सचिव सुनिल पांगम, उपाध्यक्ष ए. एस. परब, महिला उपाध्यक्षा श्रद्धा वळंजू, बी. एस. कोकणी, एस. एस. मोरे, एस. पी. नाईक, ए. यु. मुणगेकर, युवराज चव्हाण, आर. व्ही. मेस्त्री, रविंद्र कसालकर, व्ही. जी. कोलते यांच्यासह शेकडो ग्रामसेवक, ग्रामसेविका उपस्थित होते. आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक संवर्गाच्या सेवाविषयक प्रश्नांबाबत त्वरीत निर्णय व्हावा यासाठी शासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र शासनाने या मागण्यांकडे लक्ष दिले नसल्याने ग्रामसेवक युनियनच्यावतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला होता.या आहेत मागण्याकनिष्ठ ग्रामसेवकांचा सेवाकाळ सेवेत आलेल्या तारखेपासून घोषित करावा, २० ग्रामपंचायतींच्या पर्यवेक्षणासाठी १ विस्तार अधिकारी या प्रमाणात पदे मंजूर करणे, वेतनासोबत ३ हजार रुपये दरमहा कायम प्रवास भत्ता मंजूर करणे, इतर संवर्गाप्रमाणे ग्रामसेवकांना बदलीचे धोरण मंजूर करणे, नोव्हेंबर २००५ च्या ग्रामसेवकांना केवळ शासनाच्या विलंबामुळे आचारसंहितेच्या कारणास्तव नाकारलेली जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी ग्रामसेवकांचा प्रलंबित प्रवासभत्ता देयक मंजूर करणे, आदर्श ग्रामसेवकांना शासनाने मान्य केलेल्या तसेच सहाव्या वेतन आयोगात नाकारलेली वेतनवाढ त्वरीत मंजूर करणे, विनाचौकशी डाटा फिडिंगचे कामामध्ये ग्रामसेवकाची जबाबदारी नसतानाही तसेच अन्य किरकोळ कारणांनी होणारे ग्रामसेवकांचे अन्यायकारक निलंबन थांबवावे.२ जुलैपासून कामबंद आंदोलनप्रलंबित दहा मागण्यांबाबत योग्य तो न्याय द्यावा अन्यथा २ जुलैपासून सर्व ग्रामपंचायतीच्या चाव्या प्रशासनाकडे सुपूर्द करून कामबंद आंदोलन सुरु करणार असल्याचासिंधुदुर्गनगरी : ग्रामसेवकांना स्वतंत्र वेतनश्रेणी मंजूर करा, ग्रामपंचायत स्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे यासह प्रलंबित दहा मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाधिकारी भवनावर मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा दिल्यामुळे सिंधुदुर्गनगरी परिसर दणाणून गेला होता. प्रलंबित मागण्या तत्काळ मान्य करा अन्यथा २ जुलैपासून काम बंद आंदोलन पुकारू असा कडक इशाराही जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांना निवेदनाद्वारे दिला आहे.सोमवारी दुपारी रखरखत्या उन्हात शेकडो ग्रामसेवकांनी ओरोस येथील रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी भवन असा मोर्चा काढला. युनियनचे अध्यक्ष सूर्यकांत वारंग यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्चात सचिव सुनिल पांगम, उपाध्यक्ष ए. एस. परब, महिला उपाध्यक्षा श्रद्धा वळंजू, बी. एस. कोकणी, एस. एस. मोरे, एस. पी. नाईक, ए. यु. मुणगेकर, युवराज चव्हाण, आर. व्ही. मेस्त्री, रविंद्र कसालकर, व्ही. जी. कोलते यांच्यासह शेकडो ग्रामसेवक, ग्रामसेविका उपस्थित होते. आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.