शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

ग्रामसेवकांनी कामाचा वेगळा ठसा निर्माण करावा

By admin | Updated: December 30, 2015 00:45 IST

संदेश सावंत : सिंधुदुर्गनगरीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण, २३ ग्रामसेवकांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू म्हणून ग्रामसेवकाकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामसेवकांनी आपुलकी निर्माण करत कामाचा वेगळा ठसा उमटवावा, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांनी मंगळवारी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना केले. स्वच्छ भारत मिशन मार्गदर्शन कार्यशाळा व आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण सोहळा जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली शरद कृषी भवन येथे झाला. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपाध्यक्ष रणजित देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला बालकल्याण सभापती स्नेहलता चोरगे, सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल, सर्व पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, पंचायत समिती सभापती , ग्रामसेवक, स्वच्छता करंडक वक्तृत्व स्पर्धा विजेते विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. तर ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमात संदेश सावंत यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवकांचे अभिनंदन केले. ग्रामसेवकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही दिले. मात्र ग्रामसेवकांनी समोरच्याच्या शंकेचे निरसन करण्याचा प्रयत्न करावा व कार्याचा वेगळा ठसा उमटवावा असे आवाहन केले आहे. शेखर सिंह म्हणाले, ग्रामसेवकांनी जनतेशी नम्रतापूर्वक व्यवहार ठेवावेत. प्रशासनाची प्रतिष्ठाही ग्रामसेवकांवर अवलंबून आहे. त्यामुळे चुकून झालेल्या चुकीला निश्चित क्षमा असेल पण जाणून बुजून केलेल्या चुकीला क्षमा असणार नाही. असे स्पष्ट केले. उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी ग्रामसेवक हा जनता व लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असल्याचे सांगितले तर सभापती चौगुले यांनी महिला ग्रामसेवकांनी पुरस्कारात ५० टक्के आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पुरस्कारप्राप्त ग्रामसेविका अपर्णा पाटील यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले की, या आशीर्वादामुळे आत्मविश्वास जबाबदारी वाढली आहे. चांगले काम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हास्तरीय स्वच्छता मित्र व वक्तृत्व करंडक स्पर्धेच्या विजेत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. कनिष्ठ गटात आलिशा जॅकी फेराव (प्रथम), सौंदर्या सोनू शेळके (द्वितीय), जागृती मोहन राणे (तृतीय), तर वरिष्ठ गटात अनुक्रमे समृद्धी श्रीकृष्ण पेडणेकर, पूजा संतोष पाटणकर, गितांजली गुरूनाथ पेडणेकर. दोन्ही गटातील प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ११ हजार, ७ हजार व ५ हजार रूपये रोख, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.दोन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेते राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. समृद्धी हिंने मनोगत व्यक्त करताना स्वच्छतेसाठी कृतीशिलतेतून प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)२३ ग्रामसेवकांचा सत्कारसंदिप पाटील, मुकुंद परब, विलास केळूूसकर, अपर्णा पाटील, अरूण जाधव, दीपक तेंडूलकर, रतिलाल बहिराम, दीपक अमृतसागर, पंढरीनाथ पांढरे, संदिप गोसावी, आनंद परूळेकर, रघुनाथ भोगटे, चंदू रावले, मंगेश राणे, राजेंद्र भुर्के, विनोद हेरवाडे, जनार्दन खानोलकर, मंगल गवळी, विवेक वजराटकर, आदम शहा, दिनेश चव्हाण, गिरीष धुमाळे, संजय शेळके, गोकुळ कोकणी यांचा सत्कार करण्यात आला.