शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांच्या त्रासाकडे शासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: September 1, 2014 23:57 IST

शेतकऱ्यांमध्ये नाराजी

सावंतवाडी : वन्य प्राण्यांचा त्रास, लहरी पाऊस यामुळे सह्याद्रीच्या पट्ट्यात भातशेती जमीन पडीक राहिली आहे. वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळलेल्या शेतकऱ्यांना शासन दरबारी न्याय मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत. भातशेती क्षेत्र झपाट्याने घटत चालले असून शहरीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. मूलत: शेतकरी वर्गाचा तारणहार नसल्यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जात आहे. काही शेतकरी शेती आणि झाडे विकून उदर निर्वाह करीत असल्याचे दिसून येत आहे. महिला बचतगट चळवळ वेगाने फोफावत असल्याने शेतमजुरी करण्यास कामगार मिळत नाहीत. कामगार मिळाले तर शेती, मजुरी याचा ताळमेळ बसत नाही. उत्पादनापेक्षा मजुरीला जास्त खर्च करावा लागत असल्याने जमिनी पडीक राहत असल्याचेही कारण सांगण्यात येत आहे. या हंगामात उशिराने पाऊस सुरू झाल्याने तसेच मजूर आणि वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांनी सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेली शेती पडीक ठेवली आहे. त्यामुळे लाकडे तोडणारे आणि जमीन खरेदी-विक्री करणाऱ्यांसाठी सुगीचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या दलालांनी जमीन किंवा झाडे विकण्याचा तगादा लावत असल्याचे समोर येत आहे. या आणि अन्य कारणांमुळे शेतकरीवर्ग चहुबाजूंनी संकटात येत असल्याचे दिसून येत असून याचाच फायदा दलाल घेत असल्याचे बोलले जात आहे. संकटांच्या या खाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)