शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य यंत्रणेवर सरकारचा धाक नाही

By admin | Updated: June 27, 2015 00:21 IST

राज ठाकरे : मंत्री उद्घाटनांत मग्न; राज्यातील रुग्णालयांची दुरवस्था

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांची दुरवस्था झाली आहे. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये दिसून आली. मंत्री येऊन केवळ इमारतीची उद्घाटने करीत सुटले आहेत; पण येथे सुविधा आहेत कुठे? कोट्यवधीची औषध खरेदी करून पैसे उकळण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारचा यंत्रणेवर धाक राहिला नसल्याने रुग्णालयांची अवस्था बिकट बनली आहे, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी शुक्रवारी येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तेथील समस्या जाणून घेतल्या. जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेत रुग्णालयाच्या सद्य:स्थिती व उपलब्ध आस्थापनाविषयी माहिती जाणून घेतली. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी राज ठाकरे यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. जिल्हा रुग्णालयात रुग्णांकडून पैसे उकळले जातात. रुग्णांना खासगी डॉक्टरांकडे पाठविले जाते. खासगी डॉक्टरांकडून कोणती औषधे व उपचार केले याचे कोणतेही पुरावे (कागदपत्र) दिले जात नाहीत; मात्र दामदुप्पट बिल घेतले जाते. अशा व्यथा मांडल्या. यावेळी राज ठाकरे यांनी जिल्हा रुग्णालय प्रशासनाला समज देत यापुढे रुग्णांकडून पैसे लुटण्याचे थांबवा, चांगली सेवा द्या. रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याबाबत दक्षता घ्या अशा सूचना केल्या. याबाबत शासनाला अहवाल दिला आहे; परंतु अद्याप ही पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रुग्णांना योग्य सेवा देण्यात अडचणी होत असल्याचे यावेळी सांगितले,रिक्त पदांमुळे रुग्णांना सेवा देण्यात अडचणीजिल्हा शल्य चिकित्सक संजय वंदाळे यांनी जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रमुख तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. वर्ग १, वर्ग २, वर्ग ३ आणि वर्ग ४ ची सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत.