शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा १४३ कोटींचा आराखडा शासनाकडे

By admin | Updated: March 7, 2017 22:43 IST

वार्षिक योजना : वाढीव निधीसाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी

शोभना कांबळे--रत्नागिरी  सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०१७ - १८ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह््यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कमाल वित्तीय मर्यादेनुसार १४३ कोटी ६८ लाख रूपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी २५ ते ३० कोटींचा निधी वाढवून मिळावा, यासाठी वित्तमंत्र्यांकडे मागणी केली असून, त्याला सकारात्मकता दर्शविण्यात आली आहे. वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्ह््याचे पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे उपस्थित होते. गाभा क्षेत्र, बिगर गाभा क्षेत्र आणि नाविन्यपूर्ण योजना व डाटा एंट्री अशा तीन क्षेत्रांसाठी रत्नागिरी जिल्ह््यासाठी १४३ कोटी ६८ लाख रूपयांची मागणी करण्यात आली आहे. गाभा क्षेत्र २/३ तर बिगर गाभा क्षेत्र १/३ आहे. गाभा आणि बिगर गाभा क्षेत्रासाठी एकूण निधीच्या ९५ टक्के इतक्या खर्चाची तरतूद आहे तर नाविन्यपूर्ण योजना व डाटा एंट्रीसाठी पाच टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. गाभा क्षेत्रात कृषी व संलग्न सेवा, ग्रामीण विकास, सामाजिक व सामुहिक सेवा, पाटबंधारे या चार क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी प्रस्तावित तरतूद ९७ कोटी १४ लाख रूपये इतकी करण्यात आली आहे. बिगर गाभा क्षेत्रात विद्युत विकास, ग्रामीण व लघुउद्योग, परिवहन व वाहतूक, रस्ते विकास, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा अशा सहा क्षेत्रांचा समावेश आहे. यासाठी एकूण ३९ कोटी ३५ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. नाविन्यपूर्ण योजना आणि डाटा एंट्रीसाठी ७ कोटी १८ लाख रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह््यासाठी १४३ कोटी ६८ लाख रूपयांचा आराखडा शासनाकडे सादर करण्यात आला असला, तरी जिल्ह््याची मागणी ५४७ कोटी ४६ लाख इतकी आहे. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे हा निधी लवकर मिळण्याची आशा आहे. (प्रतिनिधी)दरवर्षी जिल्ह््यासाठी १५८ कोटींचा निधी आराखडा सादर केला जातो. जिल्ह््याच्या विकासाच्या दृष्टीने आणखी निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे वित्त मंत्रालयाकडून २५ ते ३० कोटींचा निधी वाढवून मिळावा, अशी मागणी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी वित्तमंत्र्यांकडे केली आहे. वित्तमंत्री केसरकर यांनीही याला सकारात्मकता दाखविल्याने हा निधी जिल्ह््याला मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.मंत्रालयात बैठक : जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांची उपस्थितीएकूण गाभा क्षेत्रासाठी प्रस्तावित रक्कम९७ कोटी १५ लाख ६० हजारकृषी व संलग्न सेवा : ६ कोटी ४८ लाखग्रामीण विकास : ४८ कोटी २४ लाखसामाजिक व सामुहिक सेवा : ४२ कोटी १३ लाखपाटबंधारे : ३० लाख ४ विद्युत विकास : ३५ लाखग्रामीण व लघुउद्योग : ३५ लाखपरिवहन व वाहतूक : ३० लाखरस्ते विकास : १५ कोटीसामान्य आर्थिक सेवा : ७५ लाखबिगर गाभा क्षेत्रासाठी प्रस्तावित रक्कम : १३६ कोटी ५० लाखसामान्य सेवा : ७५ लाखएकूण नाविन्यपूर्ण व डाटा एंट्री : ७ कोटी १८ लाखएकूण जिल्हा वार्षिक योजना : १४३ कोटी ६८ लाख