शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

सरकारी वकील सामंत कार्यमुक्त

By admin | Updated: October 9, 2015 23:38 IST

तीन वकिलांची नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी : गेली साडेआठ वर्षे जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या दोन पदांवर यशस्वीरीत्या काम केले आहे. या कालावधीत सरकार पक्षाच्यावतीने लढताना आरोपींना जन्मठेप, फाशी अशाप्रकारच्या शिक्षा दिल्या. दरम्यान, या दोन्ही पदाचा प्रदीर्घ कालावधी संपत असल्याने आपण या पदावरून कार्यमुक्त होत असल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील अमोल सामंत यांनी दिली. तसेच नव्या जोमाने खासगी दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांची कामे घ्यायला सुरुवात करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जिल्हा सरकारी वकील अमोल सामंत यांच्या सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या दोन पदांचा कालावधी गुरुवारी संपत असल्याने याबाबतची माहिती देताना ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मार्च २००७ मध्ये जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता या पदावर नियुक्त झालो. या दोन पदांवर काम करताना सरकार पक्षाच्यावतीने भरपूर कामे चालवायला मिळाली. महाराष्ट्र राज्यात सर्वांत कमी वयात सरकारी वकील या पदाची जबाबदारी सांभाळणारा पहिला वकील म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली. सगळ्या जिल्हा न्यायमूर्तींचे काम जवळून बघायला मिळाले. तसेच वेगवेगळे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे तपासकाम, कामाची पद्धत अनुभवता आली. सर्वांशी जवळच्या ओळखी निर्माण झाल्या. परराज्यातील सरकारी डॉक्टर्स, आयुक्तांपासून लोकांच्या साक्ष घेण्याचा योग आला. सरकार पक्षाच्यावतीने बाजू मांडताना आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. माझ्या कालावधीत आरोपींना जन्मठेप, फाशी, तुरुंगवास आदी शिक्षा झाल्या होत्या. आज या दोन्ही पदांच्या कालावधी संपत असल्याने मी या पदावरून कार्यमुक्त होत आहे. नव्या जोमाने पुन्हा खासगी, दिवाणी व फौजदारी कामे घ्यायला सुरुवात करणार असल्याची माहितीही जिल्हा सरकारी अभियोक्ता अमोल सामंत यांनी दिली.(प्रतिनिधी)तीन वकिलांची नियुक्तीसिंधुदुर्ग जिल्हा सरकारी वकील या पदावर वेंगुर्ले येथील सूर्यकांत प्रभु खानोलकर, सहाय्यक सरकारी अभियोक्ता अवधूत भणगे व सहाय्यक सरकारी अभियोक्ता स्वप्निल सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा सरकारी वकील अमोल सामंत हे या पदावरून कार्यमुक्त झाल्याने सहायक अभियोक्ता या पदांसाठी वरील तीन वकिलांची निवड करण्यात आली.