शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सरकार उद्योगपतींचे !

By admin | Updated: May 25, 2015 00:32 IST

पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात : भाजपमध्ये फक्त एकाधिकारशाही, मंत्र्यांना अधिकार नाहीत

कऱ्हाड : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी खिशात चेकबुक घेऊन परदेश दौरा करीत सुटलेत. हस्तांदोलन करीत बुके देणं आणि फोटो घेणं हे परराष्ट्र खात्याचं धोरण नसतं; पण उद्योगपतींना खूश करण्यासाठी मोदी हे सर्व करताहेत. सध्याचं सरकार उद्योगपतींचं आहे आणि मोदी या उद्योगपती सरकारचे प्रतिनिधी आहेत,’ असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘मोदी सरकारच्या वर्षपूर्तीच्या गोंगाटात खरी परिस्थिती जनतेसमोर येत नाही. या सरकारने आगळपागळ गप्पा मारल्या, स्वप्नं दाखविली; पण सध्या निराशाजनक परिस्थिती आहे. शेतकरी, गरीब आणि शोषित वर्गाकडे या सरकारचे दुर्लक्ष आहे. सर्व सूत्रे हातात घेऊन नरेंद्र मोदी एकाधिकारशाही गाजवीत परदेश दौरे करताहेत. मोदींना स्वत: परराष्ट्र खातं चालवायचंच असेल तर सुषमा स्वराज यांना त्यांनी दुसरं खातं द्यावं. सुषमा स्वराज चांगल्या संसदपटू आहेत; पण त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय. फक्त मोदी व त्यांचे राईटहँड अमित शहा हे भाजपचे सर्वेसर्वा आहेत. कुठल्याच मंत्र्याला त्यांनी काहीच अधिकार दिलेला नाही. सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांना त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक पाहता त्यांची मानसिकता दिसून येते. ‘स्वच्छ भारत, गंगा शुद्धिकरण, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन’ या कागदावरील गोंडस घोषणा आहेत. एकंदर या सरकारकडून देशाचं काही भलं होताना दिसत नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या एक वर्षाच्या कार्यकालाचा आम्ही निषेध करतो,’ असेही, चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)अल्पसंख्याकांची खोडी काढण्याचा उद्योगमोदी सरकारच्या प्रत्येक घोषणेला हिंदुत्वाची झालर असल्याचे सांगून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘अल्पसंख्याकांना मुद्दाम डिवचण्याचा, खोडी काढण्याचा त्यांचा उद्योग आहे. अर्थात मोदी स्वत: हे करीत नाहीत; पण जे असं करतात त्यांच्याविषयी मोदी काहीच बोलत नाहीत. भाजपचा एक नेता तुम्हाला बीफ खायचं असेल तर पाकिस्तानात जा, असं वक्तव्य करतो आणि त्यावर मोदी काहीच प्रतिक्रिया देत नाहीत हे खेदजनक आहे.’ राज्यातील युती रडतखडतशिवसेना आणि भाजपची राज्यातील युती रडतखडत चालली आहे. शिवसेना बाहेर पडण्याच्या तयारीत आहे, तर राष्ट्रवादी काहीतरी पदरात पडेल म्हणून वाट पाहत आहे. त्यामुळे राज्यातील सरकार स्थिर आहे, असं वाटत नसल्याचे माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितले.