शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

गोर बंजारा समाज एकवटणार

By admin | Updated: August 28, 2016 00:25 IST

जिल्हा मेळावा : समस्या न सुटल्यास मंत्रालयावर धडकण्याचा इशारा

मंडणगड : गोर बंजारा या भटक्या समाजाला न्याय देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत.़ त्यामुळे जातीच्या दाखल्यासह, पडताळणी, रेशनकार्डच्या समस्या, राहण्याच्या समस्या या समाजाला भेडसावत आहेत. कामधंद्यासाठी सर्वत्र विखुरलेल्या समस्त गोर बंजारा समाजाला एकत्र आणण्यासाठी रत्नागिरी येथील श्री साई मंगल कार्यालयात गोर बंजारा बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता़ या समाजाने आता आपल्या हक्कांसाठी आक्रमक होण्याचे ठरवले असून, शासनाने न्याय न दिल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशारा गोर बंजारा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. गोर बंजारा समाजाच्या गीता राठोड यांनी बंजारा समाजातील लोकांना तालुकानिहाय एकत्र आणण्यासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी जिल्ह्यातील गोर बंजारा समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून प्रयत्न चालविले आहेत. या मेळाव्यामध्ये समाजाशी निगडीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. संत सेवालाल यांच्या भक्तीने व प्रेरणेने बंजारा समाज आज एकत्र येत आहे. हा समाज संपूर्ण राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे. काही राज्यांमध्ये हा समाज अनुसूचित जाती, जमातींमध्ये समाविष्ट आहे तर अनेक ठिकाणी या भटके विमुक्तांमध्ये त्याचा समावेश करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोर बंजारा समाजातील कुटुंबे ही मोठ्या प्रमाणात मजुरीच्या निमित्ताने विखुरली आहेत. पोटापाण्याचा प्रश्न सोडवताना जीवन मरणाच्या लढाईत आजही हा समाज अनेक अडचणींचा सामना करत आहे. जातीचा दाखला, शिधापत्रिका, अधिवासाचे दाखले मिळवण्यात या समाजाला मोठ्या अडचणी येत आहेत. याबाबत ठोस उपाययोजना करुन शासनाने या समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली़ राम पवार यांनी समाजाच्या एकजुटीचे महत्व सांगतानाच समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. सामाजिक न्याय हक्कांच्या या लढाईत यश मिळवायचे असेल तर सर्व समाजबांधवांनी एकत्र राहूनच लढा देऊया, असे आवाहन पवार यांनी केले़ सुरेश चव्हाण यांनीही समाजाच्या न्याय हक्कांसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. मेळाव्याला गीता राठोड, अप्पा राठोड, सतीश राठोड, मीराबाई राठोड, जयराम राठोड, ़प्रियांका राठोड, विजय चव्हाण, शिव राठोड, डी. एम. चव्हाण, ईश्वर राठोड, संजय राठोड, महेंद्र राठोड उपस्थित होते.