शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

लाठीचार्जविरुद्ध न्यायालयात जाणार

By admin | Updated: March 7, 2016 00:40 IST

नारायण राणे : ‘कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्यास थेट मला फोन करा’

कुडाळ : गौण खनिज व्यावसायिक वाहतूकदार यांच्याकडे पोलीस किंवा महसूल विभागातील कोणीही कर्मचाऱ्याने पैशाची मागणी केल्यास त्याची माहिती मला फोनवरून द्या असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत करून येथे सुरु असलेल्या डंपर चालक-मालक आंदोलनाची भूमिका सोमवारी जाहीर करणार असून लाठीचार्ज ज्या अधिकाऱ्यांच्या आदेशाने झाला त्यांच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे ते म्हणाले.हिंसक वळण लागलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे गौण खनिज व्यावसायिक व डंपरचालक-मालक संघटना व्यावसायिक यांचा मेळावा घेतला व या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी शासनाच्या कार्यप्रणालीवर व सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणावर जाहीर टीका केली.यावेळी बोलताना राणे म्हणाले, येथे सुरु असलेले आंदोलन हे जिल्ह्यातील प्रशासनाने व जिल्हाधिकारी यांनी स्वत:च्या जाचक अटी घालून येथील गौण खनिज व्यावसायिकांना अडचणीत आणले आहे. येथील पोलीसच ४ ते ५ ठिकाणी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या अडवून पैसे घेतात. हे चुकीचे आहे.येथील आंदोलकांनी दगड घेऊन काचा फोडल्या नाहीत तर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी संगनमताने लाठीचार्ज केला व या पोलिसांच्या लाठीचार्जात मोठ्या प्रमाणात काचा फोडण्यात आल्या, असेही राणे यांनी सांगितले.तसेच लोकप्रतिनिधी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी भेट घेणे गरजेचे असते. मात्र, ते केबिनला लॉक करून केबिनमध्ये बसले होते. मात्र पोलिसांनी आंदोलनकर्त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचे सांगितले आहे. हे कितपत योग्य आहे हे समजत नाही व ते चुकीचे आहे, असेही राणे म्हणाले. (प्रतिनिधी)मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे : राणेगौण खनिज वाहतुकीच्या प्रश्नाबाबत मी स्वत: मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांशी बोललो असून त्यांनी याबाबत तोडगा काढल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शासन आदेशात आवश्यक बदल करण्यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.आमदारांनी पळ काढला : राणेलाठीचार्जनंतर येथील सत्ताधारी आमदार व माजी आमदार यांनी पळ काढला व मुख्यमंत्र्यांकडे जावून फक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. याबाबतही राणे यांनी खिल्ली उडविली.हे सरकार फसवे आहेयेथील पालकमंत्री पळपुटा आहे. भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना वास्तव काय आहे ते माहिती नाही तसेच हे सरकार फसवे असून सर्वसामान्यांसाठी व कोकणी माणसांसाठी नाही. बेबंदशाहीचे सरकार आहे असेही ते म्हणाले.सोमवारपासून येथील सुरु असलेले दारुधंदे, जुगार व्यवसाय बाहेर काढून तेथे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांचे पाप असा बॅनर लावणार आहोत असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले, व्हिक्टर डान्टस, सुरेश दळवी, संदीप कुडतरकर, रणजित देसाई, अबीद नाईक, अशोक सावंत आदी उपस्थित होते.