शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

योग्य लोकांच्या हाती नगरपंचायतची सत्ता द्या

By admin | Updated: August 30, 2015 22:56 IST

वैभव नाईक : व्यापारी, नागरिकांशी नगरविकासाबाबत संवाद

वैभववाडी : नगरपंचायतीचा दर्जा देऊन युती शासनाने वाभवे - वैभववाडीला विकासाची संधी निर्माण केली आहे. शहराच्या विकासाला भरीव निधी येण्यासाठी केंद्र आणि राज्यात सत्ता असावी लागते. त्यामुळे कमी क्षेत्रफळाच्या शहराचा झपाट्याने कायापालट करण्यासाठी योग्य लोकांच्या हाती नगरपंचायती सत्ता द्या, असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख आमदार वैभव नाईक यांनी रविवारी येथे केले.येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या सभागृहात आमदार नाईक यांनी शहरातील व्यापारी व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी तालुका प्रमुख अशोक रावराणे, माजी बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोज सावंत, माजी अध्यक्ष टी. एस. घोणे आदी उपस्थित होते.नगरपंचायतीला दरवर्षी सुमारे तीन कोटी रुपये विकास निधी शासन देते. तसेच प्रशासनही चांगले असते. त्यामुळे विकासाचे नियोजन चांगल्या प्रकारे करता येते. ते नियोजन करण्यासाठी चांगली माणसं नगरसेवक म्हणून निवडून देण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. गेल्या निवडणुकीत अपवाद वगळता कोकणच्या जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखविला. त्यामुळे युती शासनाच्या माध्यमातून कोकणात विकासाचे नवनवीन प्रकल्प येत आहेत. त्यामुळे वाभवे-वैभववाडी नगरपंचायत निवडणूक शिवसेना आणि भाजप युतीतर्फे लढविली जाणार आहे. अशी ग्वाही देत आमदार नाईक यांनी या शहराचा कायापालट करण्यासाठी जनतेने युतीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.जयेंद्र रावराणे म्हणाले, एवढ्या कमी लोकसंख्येच्या शहराला नगरपंचायतीचा दर्जा युती सरकारमुळेच मिळाला आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विचारधारेची सत्ता येथे असणे आवश्यक आहे. एक शौचालय बांधले म्हणजे विकास होत नाही. वस्ती तेथे सुलभ शौचालय, शहरात स्वतंत्र मासळी बाजार, पुरेसा नियमित पाणीपुरवठा बगिचा, तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी व्यापारी व नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्याशिवाय वैभववाडी सुंदर बनवता येणार नाही. यावेळी वैभववाडी तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंकर स्वामी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी संजय लोके यांनी शहरातील समस्या मांडून नगरपंचायत निवडणूकीत सद्विवेकबुद्धीने मतदान करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)