शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विकासासाठी शक्ती दे !

By admin | Updated: February 13, 2015 23:00 IST

विनायक राऊत : फणसगावच्या रवळनाथाला साकडे

फणसगांव : फणसगांव व विठ्ठलादेवी या दोन गावांचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी फणसगांव येथील श्री देव रवळनाथ मंदिरात भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी कोकणचा विकास करण्याची शक्ती आम्हाला दे, असे साकडे श्री देव रवळनाथाकडे करण्यात आले. यानंतर खासदार राऊत यांचा श्री देव रवळनाथ देवस्थान कमिटी फणसगांव यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर, विभागप्रमुख वैभव नर, पंचायत समितीचे सदस्य सुभाष कोकाटे, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष बिपीन तेंडुलकर, संतोष केसरकर, मनोहर गुरव, फणसगाव सरपंच उदय पाटील, उपसरपंच मंगेश गुरव, विठ्ठलादेवी तंटामुक्त समिती अध्यक्ष विश्राम नारकर, जुहू मुंबई येथील शाखाप्रमुख शरद प्रभू, पंचायत समितीचे माजी सदस्य डॉ. सर्वेश नारकर, हरिश्चंद्र पाटील, अनिल राणे, आदींसह कमिटीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सहदेव नारकर, कार्यवाह प्रभाकर नारकर, सिनिअर कॉलेजचे प्राचार्य विनायक जमदाडे, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. आर. जाधव, बाळा कुबल, आदींसह शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. (वार्ताहर)दहा लाखांचा निधी देण्याचे आश्वासनखासदार विनायक राऊत यांनी फणसगांव ज्युनिअर व सिनिअर कॉलेजला भेट दिली. फणसगांव पंचक्रोशी शिक्षण संस्था अत्यंत दुर्गम अशा भागात कार्यरत आहे.संस्थेची आर्थिक बाजू मजबूत करून त्या उत्पन्नातून हे शैक्षणिक कार्य चालू ठेवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांसाठी आवश्यक असणाऱ्या सामाजिक सभागृह बांधण्यासाठी निधीची मागणी संस्थेच्यावतीने करण्यात आली. आपल्या स्थानिक विकास निधीमधून सामाजिक सभागृह बांधण्यासाठी १० लाखांचा निधी देण्याचे आश्वासन राऊत यांनी यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.