शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संधी द्या, कुडाळचा चेहरामोहरा बदलवू

By admin | Updated: March 27, 2016 01:08 IST

सुरेश प्रभू : भाजपच्या नगरपंचायत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

कुडाळ : यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी देशाला, राज्याला मागे नेले आहे. आता देश, समाज घडविण्यासाठी मतदारांनी केंद्रात व राज्यात भाजपला साथ दिली आहे. आता कुडाळवासीयांना संधी मिळाली असून, त्यांनी नगरपंचायतीची सत्ता भाजपला दिली, तर आम्ही कुडाळचा चेहरामोहरा बदलवू, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ नगरपंचायतीसाठीच्या कुडाळ शहर भारतीय जनता पक्षाच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शनिवारी सायंकाळी व्यक्त केला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ता माधव भंडारी, कोकण संघटन मंत्री सतीश धोंड, भाजप कार्यालयीन सचिव शरद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, प्रदेश चिटणीस राजन तेली, भाजप जिल्हा प्रवक्ता काका कुडाळकर, तालुकाध्यक्ष बब्रुवान भगत, कुडाळ शहर अध्यक्ष अजय शिरसाट, जिल्हा सरचिटणीस संतोष शिरसाट, सर्फराज नाईक, नीलेश तेंडुलकर, बंड्या सावंत, मालवण तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर तसेच भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री प्रभू म्हणाले की, देशाच्या इतिहासात कधी नाही एवढा निधी व अधिकार आमच्या सरकारने राज्याला व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. त्यामुळे तळागाळापर्यंत पोहोचण्याचे काम आमचे सरकार करीत आहे. यावेळी माधव भंडारी यांनी भाजपच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तर प्रमोद जठार यांनी पुढचा खासदार हा भाजपचाच असेल व त्यासाठी आम्ही सुरुवातही केली आहे. तर मिठबांव येथील धर्माजी हडकर, प्रमोद वाडेकर व इन्सुली येथील विकास केरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. (प्रतिनिधी) लोकसभा लढविण्याचा मानस कोकणातून विजयी होणे हा खूप मोठा आनंद आहे. कोकणी जनतेची सेवा करायची संधी पुढच्या निवडणुकीतही येथील जनतेने द्यावी, असे आवाहन केले. प्रभू यांनी असे वक्तव्य केल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून पुढील लोकसभा निवडणूक लढविण्याचा त्यांचा मानस असल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे सांगत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.