शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेसाठी स्थानिक उमेदवार द्या

By admin | Updated: July 5, 2014 00:07 IST

सावंतवाडी काँॅग्रेस तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी

सावंतवाडी : आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मतदारसंघाच्या बाहेरून येणारा प्रत्येकजण इच्छुक असल्याचे सांगतो. मग सावंतवाडी मतदार संघातील कोणीच इच्छुक नाही का, असा प्रश्न करत या निवडणुकीत स्थानिक उमेदवारच हवा, अशी मागणी काँग्रेस नेते विकास सावंत व अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी केली. सावंतवाडी मातृछाया मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकारिणीच्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष बाळा गावडे, विकास सावंत, प्रकाश कवठणकर, गुरुनाथ पेडणेकर, संजू परब, सभापती प्रियांका गावडे, वेंगुर्ले तालुकाध्यक्ष मनीष दळवी आदी उपस्थित होते. बाहेरुन येणाऱ्या उमेदवारांपेक्षा विधानसभेसाठी स्थानिकांनाही संधी मिळाली पाहिजे. या मतदारसंघासाठी काहीजण इच्छुक आहेत. परंतु बाहेरून येणाऱ्या उमेदवारांपेक्षा स्थानिकांनाच संधी मिळाली पाहिजे, असे अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी सांगितले. तालुकाध्यक्ष बाळा गावडे म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाने खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामास लागण्याची गरज आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्यासोबत काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विकास सावंत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशामध्ये जनसंपर्कात कमी पडलो आहोत. या अपयशामध्ये कोणतीही मोदी लाट वगैरे नाही. काँग्रेस पक्षातर्फे म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच अन्य माध्यमातूनही विकासात्मक कामे केली आहेत. परंतु आम्ही जनसंपर्कात कमी पडल्याने पराभव स्वीकारावा लागला. येत्या निवडणुकीचा प्रचार करून पुन्हा लोकांचा विश्वास संपादन करणे गरजेचे आहे. जे काही गाव पातळीवरचे वाद असतील, ते वाद बाजूला ठेवून पुन्हा एकदा जोमाने काम करण्यात सुरुवात करण्याचे आवाहन केले. तसेच सावंतवाडी येथे काँग्रेस तालुका कार्यालयाची सुरुवातही आज शुक्रवारी करण्यात आली असून या कार्यालयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विकास सावंत यांनी केले. राणेच्या वकतव्यानंतर एक गट लांबचदोन दिवसापूर्वी युवा नेते नीतेश राणे यांनी काँग्रेसच्या सध्याच्या कामकाजावर वक्तव्य केले होते. त्यात त्यांनी काही काँग्रेस नेत्यांची नावे ही घेतली होती. त्याचे पडसाद या बैठकीवर दिसून आले. या बैठकी पासून एक गट पूर्णत: अलिप्त राहिला होता. त्याची चर्चा बैठकस्थळी होती.सावंताची कार्यालय उद्घाटनाला हजेरीसावंतवाडीत तालुका काँग्रेसच्या बैठकीला अनुपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी मात्र काँग्रेस कार्यालयाच्या उद्घाटनाला हजेरी लावली. या कार्यालयाचे सतीश सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. काँगे्रसमध्ये जिल्ह्यात कोणतेही गटतट नसून नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकसंघ राहील. तसेच ८ जुलैला बैठक होणार असून यावेळी नारायण राणे जो निर्णय घेतील, तो मान्य आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)