शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

गिरावळ देवीचा १३ डिसेंबरला डाळाप उत्सव, ४०० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:33 IST

देवगड तालुक्यातील शिरगांव पाडागरवाडी येथील जागृत श्री गिरावळदेवीचा वार्षिक डाळाप उत्सव शुक्रवार १३ डिसेंबर रोजी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे गिरावळ देवीचा १३ डिसेंबरला डाळाप उत्सव, ४०० वर्षांची परंपराशिरगांव पाडागरवाडी येथील जागृत देवस्थान; विविध धार्मिक कार्यक्रम

शिरगांव : देवगड तालुक्यातील शिरगांव पाडागरवाडी येथील जागृत श्री गिरावळदेवीचा वार्षिक डाळाप उत्सव शुक्रवार १३ डिसेंबर रोजी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या, मुक्तहस्ताने नैसर्गिक सौंदर्याची उधळण करणाऱ्या, अखंड बारमाही वाहणाऱ्या पाडागर सैतवडे धबधब्यापासून ५० फूट अंतरावर वरच्या बाजूला शिवगंगा पियाळी नदीच्या पात्रात जागृत श्री गिरावळ देवीचा चौथरा आहे. चौथऱ्यापासून जवळच असलेल्या नदीपात्रातील डोहात देवीची तीन पाषाणे आहेत. पावसाळा संपल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात ही पाषाणे डोहातून बाहेर काढून चौथऱ्यावर विराजमान केली जातात.वर्षातील सर्वसाधारण सहा महिने ही पाषाणे चौथऱ्यावर विराजमान असतात. त्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुन्हा नदीपात्रात ठेवली जातात. या दोन्ही वेळी डाळाप उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो. उत्सवासाठी शिरगांव गांवातील बारा वाड्यांतून शिधा गोळा करण्याची प्रथा आहे. गोळा केलेल्या शिध्याचा वापर महाप्रसादासाठी केला जातो.श्री गिरावळ देवीची अशीही आख्यायिका सांगितली जाते की, पाडागर येथून वाहणाऱ्या शिवगंगा पियाळी नदीच्या पलीकडच्या तीरावर ताम्हाणे गांव आहे. या गांवची श्री भराडी देवी ही श्री गिरावळ देवीची बहीण. पावसाळ्यात एक दिवस दुपारच्यावेळेला श्री गिरावळ देवी आपल्या बहिणीसाठी जेवण घेऊन नदीपात्र ओलांडत असताना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.

त्यामुळे या पाण्यात श्री गिरावळ देवी वाहत जाऊन एका डोहात स्थिरावली. पाडागर येथील कुंभार समाजातील गोठणकर घराण्यातील पूर्वजांना देवीने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला. त्यानुसार नदीपात्रातील डोहात तीन पाषाणे सापडली. ती पाळण्यात घालून नदीपात्रातून बाहेर काढून त्यांची विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली.विविध धार्मिक कार्यक्रममार्गशीर्ष महिन्यात व पावसाळा सुरू होण्यापूर्वी अशा वर्षातून दोनवेळा साजरा होणाऱ्या डाळाप उत्सवाला सुमारे ४०० वर्षांची परंपरा असल्याचे येथील जुने जाणकार सांगतात. उत्सवादिवशी सकाळी श्री गिरावळ देवीची पूजा-अर्चा केली जाते. ओटी भरणे, नवसफेड, महाप्रसाद, नवीन नवस बोलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या कार्यक्रमांना ग्रामस्थांसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. 

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेsindhudurgसिंधुदुर्ग