शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी मुलींनीच पुढाकार घ्यावा

By admin | Updated: March 15, 2016 00:20 IST

नंदिनी देशमुख : सरस्वती हायस्कूलला स्वच्छतागृह प्रदान

नांदगांव : एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या ब्रीदवाक्यानुसार मुलींनी पुढे यायला हवे. ग्रामीण भागातील मुलींच्या स्वच्छतागृहासाठी आम्ही निधी गोळा करून स्वच्छतागृह उभे केले असून, त्याची योग्य प्रकारे स्वच्छता राखणे आता तुम्हा मुलींची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब मुंबईच्या अध्यक्षा डॉ. नंदिनी देशमुख यांनी केले. नांदगाव येथील सरस्वती हायस्कूलला रोटरी क्लबतर्फे स्वच्छतागृह प्रदान कार्यक्रमात त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने डॉ. नंदिनी देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सुखदा प्रोजेक्टअंतर्गत मुंबईच्या रोटरी क्लबने नांदगाव हायस्कूलला भासणारी स्वच्छतागृहाची गैरसोय दूर केली. यावेळी व्यासपीठावर सल्लागार गव्हर्नर डॉ. राजेश दवे, नांदगांव हायस्कूलचे चेअरमन नागेश मोरये, दिलीप मुळे, मानसी नांदगावकर, अरुण पुराणिक, पुष्पा नांदगावकर, सुनील आंबेरकर, कणकवली रोटरी क्लबचे अ‍ॅड. दीपक अंधारी, नांदगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. एन. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्था पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना नागेश मोरये म्हणाले की, आमच्या या ग्रामीण भागातील मुलींची समस्या दूर करण्यासाठी रोटरी क्लबने केलेल्या मदतीबद्दल सर्व पालक व संस्थेच्यावतीने आभार मानतो. रोटरी क्लबने आमच्या संस्थेला ही केलेली मदत आमच्यासाठी सदैव प्रोत्साहनपर राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत सावंत यांनी मानले. (वार्ताहर) उद्दिष्ट ५० टक्के पूर्णत्वासडॉ. नंदिनी देशमुख यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वच्छतेचा भाग म्हणूनमुंबई रोटरीच्यावतीने ५०० स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट आहे. आमचे हे उद्दिष्ट ५० टक्के पूर्णत्वास आले असून, नांदगावचे हे स्वच्छतागृह त्याचाच एक भाग असून बांद्रा रोटरी क्लबच्यावतीने विशेषत: मुलींसाठी वस्तूंचे वाटप करण्यात आले.