शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कसाल ग्रामपंचायतीला घेराव

By admin | Updated: May 20, 2016 00:02 IST

ग्रामस्थ आक्रमक : पाणीचोरी होत असल्याचा आरोप; पाणीपुरवठा सहा दिवस बंद

ओरोस : कसालला गेले सहा दिवस ग्रामपंचायतीमार्फत होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. मात्र, याचवेळी कसाल गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या नदीवरून पडवे येथील एका बांधकामाला पाणीपुरवठा होत असल्याचे उघड झाल्याने कसाल येथील ग्रामस्थ संतप्त झाले. या ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीलाच गाठले. यावेळी सरपंच नीलिमा पारकर आणि ग्रामसेवकांना घेराव घातला. मात्र सरपंचांनी हा होत असलेला पाणी उपसा बेकायदेशीर असून आपण कोणत्याही प्रकारची परवानगी दिलेली नाही, असे स्पष्ट करताच या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उपशामुळे कसालला पाणी मिळत नसल्याचे मान्य केले. कसाल गाव हे मुंबई-गोवा महामार्गावर आणि जिल्हा मुख्यालयाजवळ आहे. या गावामध्ये चार ते साडेचार हजार लोकवस्ती आहे. या गावामध्ये सहा दिवस पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळा आणि पाणीटंचाईच्या तीव्र कालावधीत सहा दिवस पाणी नसल्याने येथील ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत.कसाल बाजारपेठ, परबवाडी, ख्रिश्चनवाडी, नवाबाजार, वझरेवाडी, हुमरणेवाडी, मर्तलवाडी, हरिजनवाडी, पारकरवाडी आदी भागांमध्ये कसाल नदीवरून नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, गेले सहा दिवस वाड्यांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. गेल्या सहा दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी सोडले नाही. नदीला पाणी नाही म्हणून पंप बंद केला आहे. हे पाणी निश्चित का येत नाही, याचा शोध घेतल्यानंतर धक्कादायक माहिती उघड झाली. या नदीवर नळपाणी योजनेला पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणापासूनच सुमारे १०० ते १५० मीटरवर २५ हॉर्सपॉवर एवढ्या क्षमतेचा मोठा पंप बसविण्यात आला आहे. या पंपाद्वारे पडवे येथील सुरू असलेल्या खासगी इमारतीला पाणीपुरवठा केला जात असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. हे हजारो लिटर पाणी वाया जात असताना कसाल ग्रामपंचायतीने या नळपाणी योजनेला का रोखले नाही? असा सवाल सरपंचांना विचारला असता याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे उत्तर त्यांनी ग्रामस्थांना दिले.यावेळी सरपंचांनी कुडाळ तहसीलदारांशी संपर्क साधला. ते बैठकीत असल्याने येऊ शकले नाहीत. मात्र, सरपंच यांच्यासह अन्य सदस्यांनी ओरोस पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करेपर्यंत सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामस्थ थांबून होते आणि पुढील कार्यवाही सुरू होती. यावेळी ग्रामस्थ प्रकाश नारकर, नवीन बांदेकर, संदीप पावसकर, अवधूत मालणकर, ग्रामपंचायत सदस्य नीलेश कामतेकर, विनिता कांदळकर, काका बांदेकर, रूपेश बांदेकर, गोविंद भिसे, नंदू आंबेरकर, अंकुश पाटकर, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)ग्रामपंचायतीकडून खासगी संस्थेस पत्रयाबाबत कसाल ग्रामस्थांनी सरपंच नीलिमा पारकर, ग्रामसेवक व्ही. जी. कोलते यांना जाब विचारला असता, या उपशासाठी किंवा हा पंप लावण्यासाठी परवानगी दिलेली नाही आणि आपल्याला याबाबत काहीही माहिती नाही, असे स्पष्ट केले. तसेच तिथे लावण्यात आलेल्या पंपातून पाणी उपसा होत असल्याचे लक्षात येताच ग्रामपंचायतीच्या वतीने खासगी संस्थेला पाणी उपसा थांबविण्याबाबत पत्र देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ग्रामस्थांची आक्रमक भूमिकायावेळी ग्रामस्थांची आक्रमक भूमिका पाहून सरपंचांसह सर्व सदस्यांनी कसाल नदी गाठत वस्तुस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी थ्री फेज कमर्शिअल कनेक्शनसह मोठा जनरेटर गाडीमध्ये ठेवण्यात आला आहे. या सर्व प्रकारची पाहणी करून पाण्याची मोठी चोरी होत असल्याचे सरपंच आणि इतर ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत यावर कारवाई झालीच पाहिजे, असा पवित्रा घेत ओरोस पोलिस ठाणे गाठले. कसाल येथे सहा दिवस पिण्याचे पाणी न सोडल्याने ग्रामस्थांनी सरपंचांना जाब विचारला.