शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गेडाम नवे पोलीस अधीक्षक

By admin | Updated: April 28, 2017 23:51 IST

गेडाम नवे पोलीस अधीक्षक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची नागपूर येथे लोहमार्ग पोलीस खात्यात बदली करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्गचे नूतन जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून आंबेजोगाई, बीड येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले आय.पी.एस. दीक्षितकुमार अशोक गेडाम यांची नियुक्ती झाली आहे. गावकर यांनी आपल्या दहा महिन्यांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात फोफावलेल्या ‘दोन नंबर’धंद्यांविरोधात आक्रमक भूमिका घेत अवैध धंदेवायिकांना ‘सळो की पळो’ करून सोडले होते.सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले दत्तात्रय शिंदे यांची डंपर आंदोलनानंतर बदली झाल्यावर २७ जून २०१६ मध्ये अमोघ गावकर यांची सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. आपल्या कर्र्तव्यात कठोर असलेले गावकर यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा घालण्यात यश मिळविले होते. गावकर यांनी कोणताच गवगवा न करता जिल्ह्यातील अवैध धंदेवायिकांचे कंबरडे मोडले होते. त्यामुळे गावकर यांचा सर्वांनीच धसका घेतला होता. त्यांची बदली व्हावी, यासाठी चातकासारखी वाटही बरेचजण बघत होते.गावकर यांची बदली झाली असल्याने त्यांच्या जागी आता बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले आय.पी.एस. दीक्षितकुमार गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नूतन जिल्हा पोलिसप्रमुखांची कार्यपद्धतीजिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम हे २०११ मध्ये आय.पी.एस झाले. बीड येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी अवैध धंदे व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यांनी स्वत: पहाटे ५ वाजता डोंगर-दऱ्यामध्ये जाऊन तेथे असणाऱ्या दारूभट्ट्या उद्ध्वस्त करून कारवाई केली आहे.जनतेमधून नाराजी : कर्तव्यदक्ष अशी अल्पावधीत ओळख निर्माण करून अवैध धंद्यांना चाप लावून सर्वसामान्य जनतेच्या मनात जागा निर्माण करणारे जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांची नागपूर येथे बदली झाली आहे. गावकर यांची एका वर्षाच्या आत बदली झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.