शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात गणेश मूर्तिशाळा गजबजल्या, मूर्तिकारांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 13:35 IST

कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला अवघा सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असून, कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिशाळांमध्ये गजबजाट सुरू झाला आहे. श्री गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात गणेश मूर्तिशाळा गजबजल्या, मूर्तिकारांची लगबग किमतीत वाढ, महागाईचा फटका, गणेशोत्सव काही दिवसांवर

ओंकार ढवणकणकवली : कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला अवघा सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असून, कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिशाळांमध्ये गजबजाट सुरू झाला आहे. श्री गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.गणेशोत्सव येणार म्हणजे भाविकांचे मन उत्साहाने भरून जाते. या उत्सवाची तयारी दोन-तीन महिने अगोदरच सुरू होते. यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने भात लावणीचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता गणेशोत्सवाची तयारी सुरू झाली आहे.गणेशोत्सवात श्री गणेश मूर्तीचे स्थान महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे सध्या गणेश मूर्तिशाळांमध्ये कारागिरांची लगबग सुरू आहे. वाढत्या महागाईमुळे गणेश मूर्तींच्या किमतीत यावर्षी वाढ झाली आहे. मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या शाडू मातीच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबरच रंग साहित्य, प्लास्टर आॅफ पॅरिस व अन्य साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत.कामगारांच्या मजुरीचे दर वाढले असले तरी कुशल कारागिर मिळणे कठीण झाले आहे. सतत जोरदार पडणारा पाऊस, त्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा अशा अनेक समस्यांच्या गर्तेत हा व्यवसाय सापडल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात गावोगावी गणेश मूर्तिशाळा असून, मूर्तिकारांना माती मळण्यापासून ते रंगकामापर्यंत कुटुंबीयांसह सर्व कामे करावी लागतात. गेल्या काही वर्षांत चांगले कारागिर मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या कलेत पारंगत असलेल्या कलाकारांना सध्या प्रचंड मागणी आहे. त्यामुळे त्यांना ह्यवजनह्ण प्राप्त झाले आहे.भाविकांकडून शाडूच्या मातीच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. मात्र, इंधन दरवाढ, कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत. गणेश मूर्तिशाळांमध्ये सध्या मूर्तिकार, कुशल-अकुशल कारागिर सध्या रात्रंदिवस कामात व्यस्त असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने लगबग सुरू आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवsindhudurgसिंधुदुर्ग