शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

कोकणात दर्शन गणरायाचे; लक्ष्य आगामी विधानसभेचे

By admin | Updated: August 29, 2014 23:09 IST

विधानसभेची रंगीत तालीमच मानली

अनंत जाधव - सावंतवाडी.. कोकणात गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा उत्सव मानला जातो. अनेक चाकरमानी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गावी येत असतात. त्यातच पुढील काही दिवसात विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार असल्याने अनेक उमेदवार सध्या गणपती दर्शनासाठी घरोघरी फिरत असून, त्यानिमित्ताने का होईना, मतदार राजाला किंमत आली आहे. ही एक गणेशोत्सवाच्या निमित्ताने विधानसभेची रंगीत तालीमच मानली जात आहे. उमेदवार जरी दर्शन गणरायाचे घेत असले, तरी त्यांचे लक्ष्य विधानसभा असल्याचे दिसून येत आहे.कोकणात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. अनेक मुंबईकर चाकरमानी गणपती उत्सवानिमित्त गावी येतात. यावर्षीच्या गणपती उत्सवाचे महत्त्व काहीसे वेगळे आहे. यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या काळातच विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्व इच्छुकउमेदवार गणपती उत्सवाचे निमित्त करून प्रत्येकाच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेणार आहेत. साधारणत: गणपतीच्या दुसऱ्या दिवसापासून हा दर्शनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. सावंतवाडीत यावर्षी निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यातील निवडणुकांपेक्षा वेगळे आहे. महायुतीकडून दीपक केसरकर, मनसेकडून परशुराम उपरकर रिंगणात असून आघाडीचा उमेदवार अद्याप ठरायचा आहे. त्यातच माजी आमदार राजन तेली, शिवराम दळवी, संदेश पारकर, बाळा गावडे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले ही मंडळीही सावंतवाडीतून लढण्यास इच्छुक असल्याने सावंतवाडी मतदार संघातील मतदार राजाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या तीन तालुक्यात विस्तारलेला हा मतदारसंघ तसा मोठा आहे. त्यामुळे उमेदवारांची गणपती दर्शनासाठी फिरताना चांगलीच दमछाक होणार आहे. तरीही निवडणुकीत मतदारराजा सर्वात मोठा असतो आणि त्याला भेटण्याची ही नामी संधी असल्याने सर्वच राजकीय पक्ष गणपती दर्शनासाठी आतुरलेले दिसून येत आहेत. दीपक केसरकर हे चतुर्थीच्या तिसऱ्या दिवसापासून दर्शन सुरू करणार आहेत. तर परशुराम उपरकर व राजन तेली दुसऱ्या दिवसापासूनच कार्यकर्त्यांकडे गणपती दर्शन घेणार आहेत. यावर्षी निवडणुका म्हटल्यावर गणपती दर्शनाचा मनोदय सर्वच नेते व्यक्त करीत आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघातून वैभव नाईक, कणकवली मतदारसंघातून आमदार प्रमोद जठार, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे, आमदार विजय सावंत यांचाही इच्छुकांमध्ये समावेश असल्याने त्यांचाही यात समावेश आहे.