शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

काळसेतील गावरहाटी १८ वर्षांनी सुरू

By admin | Updated: December 17, 2014 23:09 IST

चैतन्याचे वातावरण : गावकऱ्यांच्या प्रयत्नांना यश

चौके : गेली १८ वर्षे बंद असलेली काळसे गावातील गावरहाटी सर्व गावकरी, पालटदार, मानकरी, ग्रामस्थ सेवेकरी यांच्या गेल्या तीन वर्षांच्या अथक प्रयत्नातून व सर्व ग्रामदेवतांच्या कृपाआशीर्वादाने पुन्हा चालू करण्यात आली.यानिमित्त काळसे गावातील रवळनाथ मंदिर, पाराण परब, खंचरंगी वेताळ, मारुती मंदिर, सातेरी मंदिर, लिंगेश्वर मंदिर, दांडेकर मंदिर, सिद्ध महापुरुष मंदिर तसेच इतर सर्व मंदिरांमध्ये एकादष्णी व अभिषेक करण्यात आला. त्यानंतर काळसेवासीयांच्या उपस्थितीत श्री देव रवळनाथ मंदिर येथे चालू पालटदार आप्पा परब यांच्या हस्ते श्री देव रवळनाथाची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर सर्व देवखांबांना नेसवून सजविण्यात आले आणि अवसार (वारेसूत्र) उभे करण्यात आले. (वार्ताहर)गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानतब्बल १८ वर्षांनी काळसे गावातील वारेसूत्र पुन्हा उभे राहताच रवळनाथ मंदिर परिसर टाळ्यांच्या कडकडाटात दणाणून निघाला. त्यावेळी मंदिरात उपस्थित प्रत्येक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कुतूहल दिसून येत होते. त्यानंतर तरंगांनी रवळनाथ मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि सर्व देवतांना नैवेद्य दाखवून देवांना पावणेर घालण्यात आला. उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तब्बल १८ वर्षांनी आपल्या गावात पुन्हा गावरहाटी चालू होऊन गावात पूर्वीप्रमाणे धार्मिक कार्यक्रम सुरू होणार या आनंदामुळे गावातील अनेकजण रवळनाथ मंदिराकडे निघाले होते. मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूपयावेळी रवळनाथ मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आता येणाऱ्या काळात टप्प्याटप्प्याने सर्व देवस्थाने देवाच्या आदेशाने पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे मानकऱ्यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व गावकरी, मानकरी, पालटदार, ग्रामस्थ, सेवेकरी, महिला, तरुणांनी विशेष परिश्रम घेतले.