शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

छायाचित्रांसाठी सावरकर नाट्यगृहात गॅलरी उभारणार

By admin | Updated: August 20, 2016 00:09 IST

महेंद्र मयेकर : जागतिक फोटोग्राफर्सदिनी रत्नागिरीतील फोटोग्राफर्सची नगराध्यक्षांकडे मागणी; प्रदर्शनाला प्रतिसाद

रत्नागिरी : सावरकर नाट्यगृहात गॅलरी उभारण्यात येणार असून, या गॅलरीचा उपयोग फोटोग्राफर्ससाठी फोटोग्राफी प्रदर्शन व चित्रकारांना चित्रप्रदर्शनासाठी होणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये निवडणुका आहेत. त्यामुळे गॅलरीविषयी जास्त काही सांगत नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी केले. आतापर्यंत छायाचित्रकारांनी माझ्याकडे गॅलरीची मागणी केली नव्हती. मात्र, जागतिक छायाचित्रदिनानिमित्त ही मागणी झाली असल्याचे सांगितले.रत्नागिरी शहर व जिल्ह्यातील छायाचित्रकारांनी जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवारपासून दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांचे उद्घाटन नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या हस्ते फुगे सोडून आणि फीत कापून करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात नगराध्यक्ष मयेकर बोलत होते.यावेळी नगरसेवक मुन्ना चवंडे, बिपीन शिवलकर, ज्येष्ठ छायाचित्रकार प्रा. श्रीकांत मलुष्टे, महेश तावरे, अभिजित गोडबोले, अजय बाष्टे, संजीव साळवी, सचिन झगडे, गुरू चौघुले, साईप्रसाद पिलणकर, परेश राजिवले, चारुदत्त नाखरे, विनय बुटाला, प्रसाद जोशी, आदींसह शंभरहून अधिक छायाचित्रकार उपस्थित होते.दुसऱ्या सत्रात गप्पा-टप्पा कार्यक्रमात महेश तावरे व प्रा. श्रीकांत मलुष्टे यांनी मार्गदर्शन केले. कोकणात भरपूर निसर्गसौंदर्य आहे, याचा वापर कँडीड फोटोग्राफीसाठी कल्पकतेने करता येईल. फोटोग्राफरला आर्थिक अडचणी येऊ नयेत, यासाठी सातत्य, नियमिततेने अभ्यास करावा, स्टुडिओचा व्यवसाय अलिकडच्या काळात कमी होत असल्याचे सांगून काळानुसार सर्वांनी बदल करायला हवा, असे आवाहन तावरे यांनी यावेळी केले.दुपारच्या सत्रात दामले विद्यालयाच्या आवारात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली. या झाडांचे संवर्धन विद्यार्थी करणार आहेत. सायंकाळी मनोहर पालकर यांनी मानसिक संतुलनावर मार्गदर्शन केले.स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात फोटोवॉकचे आयोजन केले होते. त्यातील निवडक छायाचित्र प्रदर्शनात मांडली आहेत. तसेच निसर्गसौंदर्य, फुले, पूल व आॅफबीट छायाचित्रांनी मन वेधून घेतले. छायाचित्र दिनानिमित्त २० रोजी सकाळी १० वाजता आरोग्य शिबिर होईल. फोटोग्राफीच्या मार्केटिंगबाबत सुनील जाधव ११ वाजता आणि १२ वाजता उदय देसाई मार्गदर्शन करणार आहेत. सायंकाळी ६ रत्नागिरीतील फोटोग्राफीवर लघुपट दाखवण्यात येईल. ६.३० वाजता गीतांचा कार्यक्रम रंगणार आहे. (प्रतिनिधी)जुन्या काळातील फोटो सर्वांना भावले‘फोटोग्राफी डे’निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाने जिल्ह्यातील फोटोग्राफर्सची कला रत्नागिरीकरांना पाहता आली. जुन्या काळातील रत्नागिरी शहराची ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र सर्वांना भावली. नेहमी रंगीत फोटो पाहायची सवय असते. त्यात कधीतरी ब्लॅक अँड व्हाईट फोटो आल्यास पाहण्यास निश्चितच भावते. त्यामुळे हे फोटो पाहताना अनेकजण भारावून गेले होते.जुन्या काळातील फोटो सर्वांना भावले‘फोटोग्राफी डे’निमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाने जिल्ह्यातील फोटोग्राफर्सची कला रत्नागिरीकरांना पाहता आली. जुन्या काळातील रत्नागिरी शहराची ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्र सर्वांना भावली. नेहमी रंगीत फोटो पाहायची सवय असते. त्यात कधीतरी ब्लॅक अँड व्हाईट फोटो आल्यास पाहण्यास निश्चितच भावते. त्यामुळे हे फोटो पाहताना अनेकजण भारावून गेले होते.