शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

तीन मराठी शाळांचे भवितव्य अंधारात ?

By admin | Updated: May 15, 2015 23:34 IST

एकूण ५ शाळांचे अंदाजे २७ लाख ४६ हजार १४८ रुपये भाडे येणे बाकी असल्याने नगर परिषद सत्ताधाऱ्यांना शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय घ्यावा लागला

चिपळूण : शहरातील नगर परिषद मालकीच्या पाच शाळांपैकी दोन शाळांचे थकीत भाडे जमा झाले असून, उर्वरित तीन शाळांचे भाडे अद्याप जमा झालेले नाही. त्यामुळे या शाळा ताब्यात घेण्याबाबत नगर परिषद प्रशासनाने हालचाली सुरु केल्याने शाळांचे भवितव्य अंधारात आहे. चिपळूण नगर परिषदेच्या मालकीच्या शहर परिसरात पाच इमारती असून यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सुरु आहेत. गेली अनेक वर्ष या शाळांचे थकित भाडे नगर परिषदेकडे जमा न झाल्याने व वारंवार जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे पत्र व्यवहार करुनही याबाबत कोणतीच हालचाल न झाल्याने नगर परिषद प्रशासनाने शहर व परिसरातील पाच शाळा ताब्यात घेण्याचा ठराव केला. त्यानुसार पाग मराठी मुलामुलींची शाळा यांचे थकित भाडे ५९ हजार रुपये तर बापटआळी येथील कन्या शाळेचे २ हजार रुपये असे ६१ हजार रुपये थकित भाडे जमा झाल्याने या शाळा पुढील शैक्षणिक वर्षात सुरु राहणार आहेत. एकूण ५ शाळांचे अंदाजे २७ लाख ४६ हजार १४८ रुपये भाडे येणे बाकी असल्याने नगर परिषद सत्ताधाऱ्यांना शाळा ताब्यात घेण्याचा निर्णय घ्यावा लागला. दि.१० मे पर्यंत थकित भाडे जमा करण्याच्या सूचना संबंधित शिक्षण विभागाला करण्यात आल्या होत्या. त्यानुसार दोनच शाळांचे भाडे जमा झाले आहे. पेठमाप येथील मराठी व उर्दू तसेच शिवाजी चौक चिंचनाका या शाळांचे अद्यापही भाडे येणे बाकी असल्याने या शाळा नगर परिषद प्रशासनाने ताब्यात घेतल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यताअनेकांनी वतर्विली आहे. सध्या मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल कमी झाला असला तरी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना मराठी शाळेतच शिक्षण घ्यावे लागत आहे. मुलांच्या भवितव्याचा विचार करुन संबंधित शिक्षण विभागाने या शाळांचे थकित भाडे जमा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत व पुढील कारवाई टाळावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. (वार्ताहर)