शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

अधिकाऱ्यांच्या अज्ञानामुळे निधी खर्चीला नाही

By admin | Updated: June 12, 2015 00:31 IST

रामदास कोकरे यांची खंत : ई-टेंडरींगची माहिती लपविण्याचा वेंगुर्लेतील नगरसेवकांचा आरोप

वेंगुर्ले : येथील शिवाजी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नगरपरिषदेच्या मासिक सभेत गुरुवारी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत ई-टेडरिंगची माहिती लपविण्याचा त्यांच्यावर आरोप लावला. यावर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी अधिकाऱ्यांनी आदेशाच्या चुकीचा अर्थ घेतल्यामुळे विकासनिधी खर्ची झाला नसल्याची खंत व्यक्त केली. नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्याधिकारी कोकरे म्हणाले की, शासनाकडून येणाऱ्या परिपत्रकांचा चुकीचा अर्थ मागील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काढल्याने शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे, त्यामुळे विकासनिधी अखर्चित राहिला आहे, अशी माहिती कोकरे यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष कुबल यांनी नाथ पै रोडवरील गणेश कॉम्प्लेक्सच्या समोरील गटारात साचलेल्या सांडपाण्याचा नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत कारवाई करण्याचे सूचविण्यात आले. शहरातील ओहळांची साफसफाई करण्यात आली असून गटारांची साफसफाई करण्याचे काम सुरू असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले. नगरपरिषद उपविधी दुरूस्तीबाबत लवकरच कौन्सिलकडे मंजुरीकरिता प्रस्ताव आणण्यात येणार आहे, परंतु आपल्या नगरपालिकेचे भाजी मार्केट हे दैनंदिन असताना व्यावसायिकांनी आपली दुकाने नियमात न थाटल्याने ग्राहकांना बाजारात ये-जा करताना अडथळा निर्माण होत असल्याबाबत उपनगराध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर यांनी जोरदार आक्षेप घेत पूर्वीप्रमाणेच जागा निश्चित करून दैनंदिन मार्केट सुरू करावे, अशी आग्रही मागणी केली. यावर मुख्याधिकारी कोकरे यांनी तातडीने कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन दिले. घरपत्रक उतारा, जन्मनोंद आता नागरिकांना त्वरित उपलब्ध होत आहे. वारस नोंद तातडीने नोंद होण्याबाबत मुख्याधिकारी यांनी या प्रश्नी लक्ष घालणार असल्याचे अ‍ॅड. सुषमा खानोलकर व अ‍ॅड. जी. जी. टांककर यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक मनीष परब, महेश वेंगुर्लेकर, प्रशांत नेरूरकर, सुलोचना तांडेल, निला भागवत, चेतना केळुसकर, फिलोमिना कार्डोज, कार्यालयीन अधीक्षक हनिफ म्हाळुंगकर, लिपिक आनंद कदम, सागर चौधरी, संगिता कुबल, राजेश परब, कमलेश सातार्डेकर आदी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या नवीन रेन हॉर्वेस्टींग व स्वच्छता अभियानांतर्गत येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या बंदी व घर तेथे शौचालय सुविधा या योजनेला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे. (प्रतिनिधी)नगपरिषद ड्रॉमेट्री हॉल भाड्याने देणाररामेश्वर मंदिराच्या पाठीमागे असलेला नगरपरिषदेचा ड्रॉमेट्री हॉल भाड्याने देण्याचे ठरविण्यात आले असून एका दिवासासाठी ५०० रूपये भाडे आकारण्याचे या सभेत सर्वानुमते निश्चित करण्यात आले आहे.