शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कार्यसिद्धीप्राप्तीचा आनंदच मूर्तिकारांची प्रेरणा

By admin | Updated: August 28, 2016 00:24 IST

गणेश मूर्ती, कलाकुसरीचा अनमोल ठेवा : अनेक समस्यांच्या विळख्यातही भक्तिभावाची जोपासना

राजन वर्धन ल्ल सावंतवाडी गणेशोत्सवाची कोकण परंपरा देशात नावाजण्याच्या विविध कारणांपैकी एक म्हणजे इथली मूर्ती निर्मितीची कलाकुसर होय. प्लास्टर आॅफ पॅरिसला बगल देत व जुन्या परंपरेत आवश्यक तेवढेच बदल करीत मूर्ती साकारण्याच्या पद्धतीमुळे मूर्तिकारांची कला इथल्या जनसामान्यांच्या मनात घर करून आहे. महागाईचा चटका सहन करीतही येथील मूर्तिकारांचे दर मर्यादित आहेतच; त्याचबरोबर आपल्या हातांच्या कलेतून साकारणारी मूर्ती भाविकांच्या घर-मंदिरात आणि प्रत्येकांच्या हृदयात अनमोल ठेवा बनते, हाच परमोच्च आनंद मानून येथील मूर्तिकला आत्मीयतेने जोपासली जाते. भाविकांनीही महागाईचा कसलाच डांगोरा न पिटता या कलेला आपली संस्कृती म्हणून जोपासली आहे. परिणामी कोकणच्या गणशोत्सवाच्या अखंडित पंरपरेतील मूर्तिकारांचे स्थानही अनमोल राहण्यास या गोष्टीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. वर्षातील गणेशोत्सवाची धूम साजरी करण्यासाठी लहान-थोरांपासून वयोवृद्धांपर्यंत पंधरवडाभर रेलचेल सुरू असते. घरातील मूर्ती आणण्यासाठी तर चैतन्यमय वातावरणाने प्रत्येकाचे मन हर्षित झालेले असते. मूर्ती म्हणजे घरातील मांगल्य, अशीच भावना एकवटलेली असते. त्यामुळे या उत्सवात मूर्तिकारांनाही विशेष महत्त्व असते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेशमूर्ती आजही परंपरागत पद्धतीनेच बनविल्या जात असून, येथील मूर्तिकारांनीही त्याच पद्धतीचा अखंडित वारसा जोपासला आहे. मोठमोठ्या शहरात ‘प्लास्टर आॅफ पॅरिस’च्या मूर्तींनी गणेशाच्या उत्सवाला प्रदूषणाची झळ बसली आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणी या मंगलमय सणाला केवळ जल्लोषाची परंपरा निर्माण झाल्याने उत्सवात श्री गणेशाचे नाममात्र प्रेम उरले आहे. पण, अशा विघातक आणि गंभीर गोष्टीला बगल देत कोकणातील गणेश उत्सवातील मूर्तिकला थाटात आणि डौलात आपली पंरपरा कायम पाहावयास मिळते. जिल्ह्यातील मूर्तिकार शाडूच्याच मूर्ती निर्मितीवर आपला भर कायम ठेवून आहेत. धार्मिक भावना दुखावू नयेत, या एकमेव हेतूने ही मूर्ती निर्मितीची कला इथे जोपासली जातेय. मूर्ती निर्मितीच्या मातीचा तसेच वाहतुकीचाही दर वाढला आहे. आवश्यक रंगाचीही किंमत वाढली आहे. शिवाय मजुरांची घटलेली संख्या आणि मजुरीचे वाढलेले दर या व अशा अनेक कारणांमुळे दरवर्षी मूर्ती निर्मितीला महागाईचा फटका बसत आहे. तरीही महागाईची झळ सोसत कला अखंडित जोपासत जिल्ह्यातील मूर्तिकारांनी आपले ‘श्री’ प्रेम दर्शवीत आपला वारसा अखंड पेलला आहे. आजही स्वत: मूर्ती निर्मितीवर येथील मूर्तिकारांचा भर असल्याचेही प्रकर्षाने जाणवते. दरम्यान, मागील काही वर्षांत तयार मूर्ती आणून त्या रंगवून बाजारात विक्री करण्यावर भर देणाऱ्या अनेक व्यावसायिकांना, भाविकांनीही काही काळानंतर नाकारले होते. परिणामी हा प्रकार आता बंद झाल्याचे चित्र असून, स्वहस्ते मूर्ती निर्मितीला पुन्हा चांगले दिवस आले आहेत. भाविकही आपली मूर्ती मूर्तिकारानेच स्वहस्ते बनविण्यावर ठाम असतात. आपल्या मूर्तीला यंत्राने तयार करण्यापेक्षा जिवंत हाताने तयार झालेली मूर्ती भाविकांना आपला आनंद द्विगुणीत करणारा असतो.