शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा

By admin | Updated: June 2, 2017 23:17 IST

शेतकरी संपाला पूर्ण पाठिंबा

लोकमत न्यूज नेटवर्कमालवण : राज्यात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. स्वामीनाथन अहवालातील तरतुदीनुसार राज्यातील शेतकरीवर्गाला सरकारने कर्जमाफी तसेच त्यांनी पिकविलेल्या मालाला आधारभूत किंमत दिली पाहिजे. मात्र, राज्य सरकार काहीच पुढाकार घेत नसल्याची खंत माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन शेतकरीवर्गाला दिलासा द्यावा, अशी भूमिका घेतली आहे.मालवण येथील ‘नीलरत्न’ निवासस्थानी आमदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा उपाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगरसेवक दीपक पाटकर, मोहन वराडकर, संजय लुडबे, महेश जावकर, डॉ. जितेंद्र केरकर, भाई मांजरेकर, राजू बिडये, आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी नारायण राणे यांनी राज्य सरकार व प्रशासनावर टीका केली. सरकार म्हणून मंत्री काही निर्णय घेत असल्याने जिल्ह्यासह राज्यात प्रशासन असल्याची जाणीवच होत नाही. परिणामी सर्व विकासकामे ठप्प झाली असून, याचा विकासावर मोठा परिणाम झाला आहे, असे राणे यांनी सांगितले, तर आमदार वैभव नाईक यांनी सर्व कामांचे ठेके घेत जिल्ह्यात निकृष्ट दर्जाची विकासकामे केली आहेत, असाही आरोप राणे यांनी केला.मत्स्योद्योग मंत्र्यांची उडविली खिल्लीराज्याचे मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर यांनी केलेल्या विधानाची राणे यांनी खिल्ली उडवली. जानकरांना मासेमारी क्षेत्रातील काय कळते? असा सवाल करत मत्स्योद्योग मंत्री पर्ससीनचे आवाहन करून पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय करत असतील तर गप्प बसणार नाही. नियम झुगारुन पर्ससीन मासेमारी करून पारंपरिक मच्छिमारांवर अन्याय केल्यास त्यांच्यावर अन्याय होऊ न देता बाजूने राहणार असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. मात्र, जानकर यांच्या विरोधात आपल्याकडे पारंपरिक मच्छिमारांची तक्रार आली नसल्याचे राणे यांनी सांगितले.