शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासकीय तयारी पूर्ण, उद्या होणार मतदान

By admin | Updated: April 16, 2016 00:29 IST

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस कुमक तैनात

कुडाळ गावाकडून नगराकडे 

रजनीकांत कदम -- कुडाळकुडाळ नगरपंचायतीच्या १७ जागांच्या निवडणुकीची सर्व प्रकारची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस कुमक तैनात करण्यात येणार आहे.कुडाळ निवडणुकीच्या १७ प्रभागांसाठी १७ मतदान केंद्रे आहेत. या निवडणुकीसाठी एकुण १२ हजार ६७ मतदार असून यामध्ये ६ हजार १२३ पुरूष तर ५ हजार ९४४ महिला मतदार आहेत. एकूण १७ मतदान केंद्र्रे आहेत. मतदान काळात अधिकारी कर्मचाऱ्यांना तीन प्रशिक्षणे ठेवण्यात आली असून यापैकी पहिले प्रशिक्षण १ व दुसरे १२ एप्रिल रोजी पार पडले आहे. तिसरे प्रशिक्षण १६ एप्रिल रोजी होणार आहे. १६ तारीखला मतदान साहित्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच मतदान मोजणीचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.सदरच्या मतदान प्रक्रियेकरीता एकूण ७६ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये वर्ग एकचे अधिकारी २, क्षेत्रिय अधिकारी ६, केंद्राध्यक्ष १९, मतदान अधिकारी १९, कर्मचारी ३८ तसेच शासकीय आठ वाहने आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मतदानाच्या दिवशी १२ पोलिस अधिकारी, ९८ पोलिस कर्मचारी, एस. आर. पी. एफ. फोर्स व आर. सी. पी. फोर्स अशा प्रकारे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर मतमोजणीच्या वेळी ४ पोलिस अधिकारी, ५५ पोलिस कर्मचारी, एस. आर. पी. एफ. फोर्स व आर. सी. पी. फोर्स अशा प्रकारे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. न्यू इंग्लिश स्कूल कुडाळमध्ये चार मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. यात प्रभाग १ कविलकाटे, प्रभाग २ डॉ आंबेडकर नगर व प्रभाग ८ मस्जिद मोहल्ला यांचा समावेश आहे. तर कन्या शाळेत दोन मतदान केंद्रे आहेत. जिल्हा परिषद कन्या शाळा या ठिकाणी दोन प्रभागांची मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रभाग ३ लक्ष्मीवाडी, प्रभाग ४ बाजारपेठ यांचा समावेश आहे. तर जिल्हा परिषद केंद्रशाळा येथे प्रभाग ५ कुडाळेश्वरवाडी व प्रभाग ६ गांधी चौक या प्रभागांची मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. जिल्हा परिषद कुंभारवाडी शाळेत तीन प्रभागांची तीन मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग ९ नाबरवाडी, प्रभाग १० केळबाईवाडी व प्रभाग १५ मधली व खालची कुंभारवाडी यांचा समावेश आहे. कुडाळ हायस्कूल कुडाळ येथे तीन प्रभागांची मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग ११ वाघसावंत टेंब, प्रभाग १२ हिंदू कॉलनी व प्रभाग १३ श्रीरामवाडी या प्रभागांचा समावेश आहे. जिल्हा परिषद पडतेवाडी शाळेत दोन प्रभागांसाठी दोन मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. यामध्ये प्रभाग १४ अभिनवनगर, प्रभाग १६ एमआयडीसी परिसर या प्रभागांचा समावेश आहे. जिल्हा परिषद सांगिर्डेवाडी शाळेत प्रभाग १७ सांगिर्डेवाडीचे एक मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. कुडाळ नगरपंचायत निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या मतदान केंद्राच्या माहितीबरोबरच या मतदान केंद्राप्रमाणे मतदार याद्याही निश्चित करण्यात आल्या असून, त्या मतदार याद्याही प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.