शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर इंधन दराचे युद्ध

By admin | Updated: October 12, 2015 00:39 IST

कर्नाटकात फलक झळकले : महाराष्ट्रापेक्षा तीन ते साडेतीन रुपये स्वस्तात विक्री होत असल्याने गर्दी --लोकमत विशेष

मिरज : पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करून आकारण्यात येणाऱ्या स्थानिक व दुष्काळ करामुळे राज्यात इंधन महागले आहे. कर्नाटकात इंधन स्वस्त असल्याने कर्नाटक सीमेवरील व महामार्गावरील पेट्रोल पंपांना मोठा फटका बसला आहे. कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांवर ‘महाराष्ट्रापेक्षा स्वस्त’ असे फलक लावण्यात आले आहेत. इंधन कर कमी करण्यासाठी पेट्रोल पंपचालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.राज्यात एक आॅक्टोबरपासून पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द करून डिझेलवर प्रति लिटर दोन रुपये दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही डिझेल महागले आहे. महाराष्ट्रात विविध स्थानिक करांमुळे लगतच्या कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, गोवा या सात राज्यांपेक्षा महाराष्ट्रात सरासरी ३.५० रुपये प्रति लिटर जादा दर आहे. त्यामुळे राज्याच्या सीमेवर असलेल्या पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. राज्यात मुंबई विकास कर (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) म्हणून प्रति लिटर तीन रुपये आकारणी होते. नागपूर, औरंगाबाद, नंदुरबार, ठाणे, अमरावती, बारामती या शहरात रस्ते विकासासाठी प्रति लिटर १ ते ४ रुपये जादा व्हॅट आकारणी होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद व अहमदनगर या शहरात लष्करी छावणी असल्याने येथे इंधनावर एलबीटी व जकात वसुली आजही सुरू आहे. त्यातच या महिन्यापासून डिझेलवर दुष्काळ कर आकारणी सुरू करण्यात आल्याने, शेजारच्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर वाढले आहेत. अनेक शहरात पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे असल्याने शहरातील व शहराबाहेरील पेट्रोल पंप चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. राज्यांतर्गत मालवाहतुकीतून ४० टक्के डिझेल विक्री होते. दरवाढीमुळे डिझेल विक्री शेजारच्या राज्यात स्थलांतरित होऊन हजारो कोटींचे नुकसान होण्याची भीती राज्यातील पेट्रोल पंप चालकांना आहे. महाराष्ट्रात इंधन दरवाढ झाल्यामुळे कर्नाटक सीमेवरील पेट्रोल पंपांच्या इंधन विक्रीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्नाटक हद्दीतील पेट्रोल पंपांवर महाराष्ट्रापेक्षा स्वस्त इंधनाचे फलक झळकत आहेत. राज्य शासनाने इंधनावरील वेगवेगळे अधिभार व स्थानिक कर कमी करून दरातील तफावत दूर करण्याची पेट्रोल पंप चालकांची मागणी आहे. व्यवसायावर परिणाम : पंपचालक चिंताग्रस्तमहाराष्ट्राच्या तुलनेत डिझेल गोव्यात प्रति लिटर ५.५० रुपये, गुजरातमध्ये ३.६२, कर्नाटकात ३.५२, छत्तीसगडमध्ये ३.५३, आंध्रमध्ये १.८१ रुपये स्वस्त आहे. पेट्रोल सरासरी २ ते ३ रुपये स्वस्त आहे. त्यामुळे इंधन विक्री व्यवसायावर परिणाम झाला असल्याचे पेट्रोल पंप चालकांचे म्हणणे आहे. कर रद्द करण्याच्या मागणीबाबत मंगळवार, दि. १३ रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत पेट्रोल पंप चालकांची बैठक होणार आहे.दररोज सहाशे ते एक हजार लिटरने घटजिल्ह्यातील १७८ पेट्रोल पंपांपैकी मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात कर्नाटक सीमेवर सुमारे ४० टक्के पेट्रोल पंप आहेत. सीमेवरील पेट्रोल पंपांवरील इंधन विक्रीत दररोज सहाशे ते एक हजार लिटर घट झाली आहे. विक्री घटल्यामुळे या पेट्रोल पंपांवरील कामगारांत कपात करावी लागणार आहे.वेगवेगळ्या स्थानिक करांमुळे पेट्रोल व डिझेलची दरवाढ होऊन इंधन विक्रीत घट झाली आहे. स्थानिक कर रद्द करावा, या मागणीसाठी पेट्रोल पंप चालकांना आंदोलन करावे लागणार आहे. जिल्ह्यात मिरज, कवठेमहांकाळ व जत या कर्नाटक सीमेवरील तालुक्यातील पेट्रोलपंपांच्या इंधन विक्रीवर परिणाम झाला आहे. इंधनावरील कर रद्द करण्याबाबत अर्थमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही, तर इंधन विक्री बंद आंदोलन करण्यात येईल.- संतोष आरवट्टगी, अध्यक्ष, जिल्हा पेट्रोल पंप मालक संघटना