शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मिनी पर्ससीन नेटधारकांचा मोर्चा

By admin | Updated: November 17, 2015 00:02 IST

विविध मागण्या : मत्स्य व्यवसाय संचालक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मिनी पर्ससीन नेट नौकामालकांवर अन्याय होत असल्याने सोमवारी सकाळी मत्स्य विभागाच्या कार्यालयावर मिनी पर्ससीन नेट मच्छिमार मालक संघटनेने मोर्चा काढला. त्यानंतर मागण्यांचे निवेदन सहाय्यक मत्स्य व्यवसाय उपसंचालक ना. वि. भादुले यांना देण्यात आले.याप्रसंगी मिनी पर्ससीन नेट संघटनेचे मार्गदर्शक माजी आमदार बाळ माने, सल्लागार अविनाश ऊर्फ भाऊ शेट्ये, अध्यक्ष निसार इक्बाल वस्ता, उपाध्यक्ष उदय सुरेश पाटील, उपसेक्रेटरी विलास फझल सोलकर आदी उपस्थित होते.आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी मिनी पर्ससीन नेट नौकामालकांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेऊन मिनी पर्ससीन नेट मच्छिमार मालक संघटनेची स्थापना केली आहे. जिल्ह्यात मिनी पर्ससीन नेटधारकांच्या सुमारे १२५ नौका आहेत. या नौकांना मर्चंट शिपिंग अ‍ॅक्ट १९५८ अंतर्गत रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि फिशिंग पास मिळवण्यासाठी नौका मालकांनी मत्स्य विभागाकडे प्रस्ताव दाखल केले आहेत. हे प्रस्ताव मे २०१४ पासून मत्स्य विभागाकडे पडून आहेत. त्यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मत्स्य विभागाकडून गेले वर्षभर निव्वळ टाळाटाळ करण्यात येत आहे. याचा विभागाकडून गेले वर्षभर निव्वळ टाळाटाळ करण्यात येत आहे.त्याचा निषेध करण्यासाठी मिनी पर्ससीन नेटमालकांच्या संघटनेतर्फे सोमवारी मिरकरवाडा जेटीवरुन मत्स्य कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी नेटमालकांच्या संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)पर्ससीनमुळे गरजेपेक्षा जास्त मासेमारी होत आहे. त्यामुळे २०१२नंतरच्या मिनी पर्ससीन नेटलाच नाही तर कोणत्याही पर्ससीन नेटला परवाना न देण्याचा शासनाचा आदेश आहे. जिल्हाभरातून फायबर बोटीसाठी ४७ प्रस्ताव आले आहेत. त्यापैकी ७ व्ही. आर. सी. मान्य आहेत. २० प्रस्तावांमध्ये कागदपत्रांची त्रुटी आहे. याची माहिती बोटमालकांना देण्यात आली आहे, तर २० मिनी नेटपर्ससीनचे प्रस्ताव बोटमालकांना परत केले आहेत.- ना. वि. भादुले, उपसंचालक, सहाय्यक मत्स्य व्यवसाय