शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘एफआरआय’चा वापर महिलांनी करावा !

By admin | Updated: May 11, 2016 23:52 IST

शंकर पाटील : सिंधुदुर्ग पोलिस दलाचे नावीन्यपूर्ण अ‍ॅप

मालवण : जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे याच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग पोलिस दलातर्फे जिल्ह्यात ‘एफआरआय’ हे नावीन्यपूर्ण असे अ‍ॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. मुली तसेच महिलांनी तातडीच्या अत्यावश्यक मदतीसाठी याचा वापर करावा, असे आवाहन मालवणचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.अ‍ॅपबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील प्रत्येक दोन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. तसेच नियंत्रण कक्ष येथे सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या वेबसाईटवर ‘एफआयआर’ला प्रतिसाद मिळत आहे. अ‍ॅप कार्यान्वित करण्यासाठी अप्पर पोलिस निरीक्षक प्रकाश गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक आनंदराव काळे व सहकारी यांनी विशेष प्रयत्न केले. महिला व मुलींनी वरील उपयुक्त अ‍ॅप डाऊनलोड करून नोंदणी करून ठेवावी. या अ‍ॅपच्या सुधारणेसाठी नागरिकांच्या सूचना अथवा तक्रारी असल्यास पोलिस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधावा. तसेच या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)असे असेल अ‍ॅपस्मार्टफोनवरील प्ले स्टोअरमध्ये जाऊन ‘एफआयआर’ या नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊन लोड करावे. त्याचा आयकोन दिसेल. संकटात सापडल्यास व्यक्तीने मदतीसाठी स्मार्टफोनमध्ये इन्सस्टॉल असणारे हे अ‍ॅप ओपन करून ‘हेल्प’ असे लिहिलेले लाल बटन दाबताच अ‍ॅपच्या माध्यमातून मदतीचा संदेश पोलिस नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग येथे मिळेल. संदेश प्राप्त होताच मोबाईलवरील हेल्प बटणाचा रंग निळा होतो. नियंत्रण कक्षात संदेश प्राप्त झाल्यानंतर संकटात सापडलेल्या व्यक्तीपासून नजीकच्या अंतरावर तातडीने उपलब्ध होणारे पोलिस अधिकारी-कर्मचारी यांना सूचित केले जाते. आणि लागलीच पोलिस मदत मिळते.