शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

फसवेगिरी संपली, सतर्कता वाढली

By admin | Updated: March 16, 2015 00:08 IST

उत्पादक होतोय सतर्क : काजूच्या व्यवसाय बनला सचोटीचा !--काजू रे काजू भाग-२

मेहरून नाकाडे - रत्नागिरी  काजूच्या उत्पादकतेमध्ये चढ उतार असला तरी ग्रामीण भागापासून शहरापर्यंत ठिकठिकाणी विके्रेते काजू बी खरेदी करताना दिसतात. ग्रामीण भागातील काजू बी खरेदी परप्रांतीयांकडून सर्वाधिक होत असलेल्याचे दिसून येते. बेकरी उत्पादनावर काजू बीचे प्रमाण हळूहळू घटत आहे. शिवाय सतर्कतेमुळे फसवेगिरीचे प्रमाण कमी झालेले दिसून येत आहे.बेकरीची उत्पादनांच्या बदल्यात काजू बी खरेदी करण्यात येते. अजूनही हे प्रमाण असले तरी ते किरकोळ आहे. ग्रामीण भागातील अनेक मंडळी शहरात नोकरी किंवा कामानिमित्त येत असल्याने दराबद्दल जागरूकता आली आहे. शहरात दर चांगला मिळत असला तरी तो निवडक किंवा दर्जेदार काजूला मिळतो. त्यामुळे परप्रांतीयांना सरसकट काजू बी घातली जाते. ग्रामीण भागातून परप्रांतीय ७० ते ८० रूपयांना खरेदी करून शहरात आणून तेच काजू ९० ते ९२ रूपयांना विकतात. काजू व्यवसायातील आता परकेपण संपले असून स्थानिकांचाही या व्यवसायात सहभाग वाढत आहे. शिवाय उत्पादक शेतकरीही सजग झाला असल्याने व्यवसायात प्रामाणिकपणा आणि सजगपणा आला आहे.वास्तविक बोंड तयार झालेनंतर त्यापासून विलग झालेले काजू निवडले जातात. मात्र काही शेतकरी हिरव्या बोंडाचे काजू काढले जातात. सुरूवातीला दर चांगला मिळत असल्याने अधिकाधिक काजू विक्रीला घातला जातो. शिवाय चोरीचे प्रमाण वाढत असल्याने राखणीला मनुष्यबळ खर्च करणे परवडत नाही. परिणामी शक्यतो काजू बी गोळा करण्यासाठी घाई केली जाते. ग्रामीण भागात सुशिक्षित मंडळीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये जागरूकता आली आहे. भैय्यांना काजू बी घालताना दराबाबत घासाघीस नक्कीच केली जात आहे. परप्रांतीय काजूचा दर्जा पाहत नसल्यामुळे सरसकटसाठीचा दर दिला जातो. परिणामी दर कमी लाभत आहे. रत्नागिरीचे काजू चवीला गोड व रूचकर असल्यामुळे परराज्यातून चांगली मागणी होत आहे. परप्रांतीयांकडून काजू बी गोळा करताना दर्जा तपासला जात नाही. लहान मोठी बी घातली जाते. त्यामुळे दर कमी प्राप्त होतो. मात्र, निवडक काजूला दर चांगला मिळतो. रत्नागिरी काजूची बेंगलोरमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.- प्रशांत टिळेकर, काजू व्यावसायिक, रत्नागिरी.