शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणाच्या भूसंपादनास दोन वर्षे?

By admin | Updated: June 5, 2014 00:41 IST

चिपळूण, राजापूर, लांजात भूसंपादनात अडथळे

 रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले असले, तरी रत्नागिरी जिल्ह्यातील महामार्गालगतच्या जमिनी संपादन करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. चिपळूण, लांजा, राजापूरसह काही बाजारपेठांतील जागांचे संपादन करण्यात अडथळे असून, तेथे रस्ता रुंदीकरणात काहीअंशी शिथिलता दिली जाण्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी सुरू आहे. पत्रकारांनीही त्यासाठी पुढाकार घेऊन आंदोलने केली होती. वाढत्या अपघातामुळे तसेच वारंवार होणार्‍या वाहतूक कोंडीमुळे महामार्ग चौपदरीकरणाचा विषय गाजत आहे. जनरेट्यामुळे हे चौपदरीकरणाचे काम मार्गी लागत असून, रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी १६१ कि. मी. ते झाराप ४५० कि.मी. या अंतराकरिता चौपदरीकरण होणार आहे. कशेडी ते संगमेश्वरपर्यंत १६१ ते २६५ कि.मी., संगमेश्वर ते राजापूर विभागात २६५ ते ३५१ कि.मी.व राजापूर ते झाराप ३५१ ते ४५० कि.मी. अशा चार टप्प्यांत चौपदरीकरणाचे काम रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणार आहे. चौपदरीकरणाच्या कामासंबंधी शासन आदेशानंतर कामाचे आदेशही काढण्यात आले आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात चौपदरीकरणासाठी आवश्यक ८० मीटर्स रुंद जागेच्या संपादनासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे चौपदरीकरण प्रत्यक्षात येण्यास तीन ते पाच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) धोरण शिथिल होणार मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करताना रुंदीकरण वा भूसंपादनात काही अडचणी आहेत. चिपळूण बाजारपेठेतून हा रस्ता जाणार असल्याने तेथेही भूसंपादन होणार आहे. मात्र, दुकाने जवळ असल्याने तेथे रुंदीकरणाबाबत काही शिथिलता असावी, अशी मागणी असल्याने तशी शिथिलता महामार्गावरील बाजारपेठांना देण्याचा धोरणात्मक निर्णय होण्याचे संकेत आहेत.