देवरूख : भुतान येथे ८ व ९ आॅगस्ट या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धेसाठी देवरूखच्या चार खेळाडूंची भारतीय संघात निवड झाली आहे.आॅलिम्पिक असोसिएशनच्या वतीने भुतान येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. १७ वर्षांखालील व वरिष्ठ गटातील आंतरराष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धेसाठी देवरूखातील ४ जणांची निवड करण्यात आली आहे. १७ वर्षांखालील भारतीय संघात श्रावणी दीपक सावंत, ओंकार दीपक करंडे यांची, तर वरिष्ठ गटातील भारतीय संघात आकाश संतोष करंडे, विकास विनायक साळवी यांची वर्णी लागली आहे. नाशिक येथे इनडोअर हॉकी असोसिएशनच्या वतीने निवड चाचणी घेण्यात आली. या निवडी चाचणीमध्ये चारही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यामुळे भुतान येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर कोलकाता येथे १ ते ५ आॅगस्ट दरम्यान होणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी श्रावणी, ओंकार, विकास, आकाश ३१ रोजी कोलकाता येथे रवाना होणार आहेत. या चारही खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यशस्वी खेळाडूंना रत्नागिरी हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजकुमार इंगळे, सचिव निखील कोळवणकर, सदस्य विनोद पोळ, आंतरराष्ट्रीय इनडोअर हॉकी खेळाडू सागर पवार, सांगलीचे पांगम आदींनी अभिनंदन केले आहे. (प्रतिनिधी)आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या देवरूखमधील खेळाडूंचा अभिमान नाशिक येथील चाचणी स्पर्धेत खेळाडूंची निवड स्पर्धापूर्व प्रशिक्षण कलकत्ता येथे १ ते ५ आॅगस्टला होणार चार खेळाडूंनी केले उत्कृष्ट केळाचे प्रदर्शन देवरूखमधील खेळाडूंच्या कामगिरीवर भर
देवरूखचे चार खेळाडू भारतीय संघात
By admin | Updated: July 28, 2015 23:52 IST