शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात वीज पडून चार जखमी

By admin | Updated: June 15, 2017 23:07 IST

जिल्ह्यात वीज पडून चार जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंधुदुर्ग : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, गुरुवारी वीज पडून ठिकठिकाणी झालेल्या घटनांमध्ये एकूण चारजण जखमी झाले आहेत. यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-आरोसबागवाडी येथील सुमित्रा लक्ष्मण धुरी व त्यांचा मुलगा दत्तात्रय धुरी, तर दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथील सोनू खरवत (वय ५५) व सुनंदा खरवत (५०) या पती-पत्नीचा समावेश आहे. सुमित्रा धुरी यांचे दोन्ही पाय भाजले आहेत. त्यांच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. या भागातील काही घरातील वीज उपकरणेही विजेच्या धक्क्याने जळून खाक झाली आहेत.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पाऊस चांगलाच बरसला आहे. समुद्र खवळला असून, किनारपट्टीवर जोरदार लाटा धडकत आहेत. जिल्ह्यात संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या असून, नुकसानीचा आकडा लाखो रुपयांच्या घरात पोहोचला आहे. येत्या ४८ तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता मच्छिमार बांधवांनी वर्तविली आहे.गुरुवारी दुपारी बांदा शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सुमित्रा धुरी घराच्या मागच्या पडवीत आपल्या कुटुंबीयांसह जेवणासाठी बसल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या उजव्या हातावर आणि दोन्ही पायांवर विजेचा लोळ कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या, तर त्यांचा मुलगा दत्तात्रय धुरी याला किरकोळ दुखापत झाली. येथील स्थानिकांनी त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली कासार यांनी त्यांच्यावर उपचार केले.सद्य:स्थितीत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याचे डॉ. कासार यांनी सांगितले. आरोसबाग येथील विजेची उपकरणेही विजेच्या धक्क्याने नादुरुस्त झाली आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. विजांच्या कडकडाटामुळे बांदा शहरातील दूरध्वनी व विजेची सेवा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित करण्यात आली होती.गुरुवारी दोडामार्ग तालुक्यात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगांच्या गडगडाटासह काही भागात जोरदार पाऊस कोसळला. तालुक्यातील मणेरी धनगरवाडी येथील सोनू खरवत यांच्या घरावर दुपारी साडेतीन वाजता विजेचा लोळ कोसळला. यावेळी सोनू खरवत हे पडवीत बसले होते व त्यांची पत्नी व मुले बाजूला बसली होती. या विजेचा धक्का त्यांनाही बसला. काही काळ त्यांचे शरीर सुन्न झाले. या धक्क्याने सोनू खरवत यांच्या पाठीवर व हातावर व्रण उठले, तर पाठीवरचा काही भाग काळपट पडला. विजेच्या लोळामुळे घराच्या भिंतीना भेगा पडल्या. तसेच घराच्या छपराचेही मोठे नुकसान झाले. वीजमीटर तसेच घरातील उपकरणेही जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे. हा विजेचा लोळ ज्याठिकाणी पडला त्याठिकाणी गॅस सिलिंडर होता. जर लोळ गॅस सिलिंडरच्या बाजूने गेला असता तर मोठा अनर्थ घडला असता.