शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडदळकरांसह चौघांना अटक

By admin | Updated: July 8, 2014 00:35 IST

काँग्रेस तालुका उपाध्यक्षांना मारहाण प्रकरण

कुडाळ : काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश पावसकर यांना मारहाण केल्याप्रकरणी जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस साईनाथ म्हाडदळकर याच्यासह चौघांंना कुडाळ पोलिसांनी अटक केली आहे. यामधील अन्य अकराजणांची चौकशी करणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. कुडाळ येथील एमआयडीसी गणेशवाडी येथे काँगे्रेसचे तालुका उपाध्यक्ष रुपेश पावसकर यांना साईनाथ म्हाडदळकर व त्यांच्या अन्य १४ साथीदारांनी शनिवारी रात्री ९.३० वाजता लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी रॉड व लाकडी दांड्याचा वापर करून मारहाण केली होती. याप्रकरणी पावसकर यांनी कुडाळ पोलिसात साईनाथ म्हाडदळकर, भूषण राणे, अनुय वेंगुर्लेकर, दादा चव्हाण, महेश म्हाडदळकर व अन्य दहाजणांविरोधात तक्रार नोंदविली होती. यातील साईनाथ म्हाडदळकर, भूषण राणे, अनुप वेंगुर्लेकर, दादा चव्हाण यांना सोमवारी दुपारी अटक केली होती. तसेच मारहाणीमध्ये वापरण्यात आलेल्या तीन कार गाड्या व इतर काही साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणातील अन्य दहा जण असून त्यांची नावे मिळाली नाहीत. त्यांचा तपास सुरू आहे. तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुपेश पावसकर यांचाही तपास करण्यात येईल, अशी माहिती कुडाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार यांनी दिली. जिल्हा पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे यांनीही कुडाळ पोलीस ठाण्याला भेट देऊन याप्रकरणाबाबत माहिती घेतली. दरम्यान, अटक झालेले साईनाथ म्हाडदळकर व त्यांचे अन्य तीन साथीदार यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)