शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

संघटित शक्तीतून उदरनिर्वाहाचा पाया

By admin | Updated: September 4, 2016 00:30 IST

सेंट बेनेडीक महिला बचतगटाची किमया : मच्छी व्यवसाय, कॅटरिंंगसह शिवणकामात नावलौकिक

सावंतवाडी : एकमेकींच्या दैनंदिन सहवासातून जोडल्या गेलेल्या महिलांनी संघटित होत बचतगटाची स्थापना केली आहे. या संघटित ताकदीच्या जोरावर दैनंदिन गरजा भागवित या रणरागिणींनी मच्छी व्यवसाय, कॅटरिंग, शिवणकाम, आदी उद्योगांच्या यशस्वीतेतून उदरनिर्वाहाचा भक्कम पाया उभारला आहे. सेंट बेनेडिक महिला बचतगटाची ही यशोगाथा सावंतवाडी तालुक्यात नावलौकिक करून आहे. सावंतवाडी-खासकिलवाडा येथील सेंट बेनेडीक महिला बचतगटाची स्थापना २२ जुलै २००९ला सर्व महिलांनी एकत्रित येऊन केली. सुरुवातीला या बचतगटाने ५० रुपये प्रतिमहा वर्गणी काढून गटाला सुरुवात केली. बचतगटाच्या यशस्वी वाटचालीने ही वर्गणी आता १०० रुपये प्रतिमहापर्यंत पोहोचली आहे. एकमेकांच्या सहकार्याने या महिलांनी आपल्या गरजा भागवित यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. प्रारंभी या बचतगटाने मत्स्य विक्रीचा व्यवसाय सुरू केला. सावंतवाडी शहरातील मच्छी बाजारपेठेत आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. महिलांच्या संघटित शक्तीचा नगर परिषदेतील हा बहुधा पहिलाच प्रकार तसा परिषदेच्या प्रशासनातही कौतुकास्पद ठरला. त्याचबरोबर गटातील काही महिलांनी कॅटरिंग, शिवणकामसारखे व्यवसाय सुरू केले. यातून या महिलांना रोजगार निर्मितीही झालीच; त्याचबरोबर उदरनिर्वाहाचा प्रश्नही निकालात निघाला. यातून येणारा फायदा दरवर्षी बचतगटातील महिलांना वाटप केला जातो. यामध्येही आजपर्यंत विश्वासार्हता जपली गेली आहे.पर्यटन महोत्सवाच्या कार्यक्रमातही या बचतगटाने विविध स्टॉल लावून रोजगाराचे साधन उपलब्ध केले आहे. महिला सक्षमीकरणासाठी वेळोवेळी धडपडणाऱ्या या बचतगटातील महिलांनी एकत्रित येत गेल्या सात वर्षांपासून महिला संघटन करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान योजनेंतर्गत दोन लाख रुपये बचतगटाला देण्यात आले होते. त्याची परतफेड सर्व महिला एकत्रितपणे व्यवसायातून करीत आहेत. प्रशासनाने या बचतगटाला सुविधांद्वारे सहकार्य केले आहे. त्यांच्या विश्वासास पात्र ठरण्याचे काम या बचतगटाने केले आहे.सावंतवाडी-खासकिलवाडा येथील सेंट बेनेडीक महिला बचतगटात अध्यक्ष एलिजा जॉनी डिसोजा, उपाध्यक्ष दर्शना डिसोजा यांच्यासह सदस्य मॉलिनी डिसोजा, लेपोलदीन डिसोजा, लुईजा डिसोजा, त्रिजा डिसोजा, इनासीन डिसोजा, इजाबेल डिसोजा, आशा फर्नांडिस, संध्या घोन्साल्विस, लुड्डीन डिसोजा आदींचा समावेश आहे.यशाच्या पायरीसाठी प्रयत्नांची गरजव्यवसायात दरवेळी नफाच होतोच असे नाही. काही वेळा तोटाही सहन करावा लागतो. यावेळी खचून न जाता जोमाने आपला व्यवसाय सुरू ठेवून मागील तोट्याची दरी भरून काढण्यास प्रयत्न करावे लागतात. यशाची पायरी नक्कीच आपल्याला मिळते. तिथपर्यंत प्रयत्न गरजेचे आहेत आणि महिलांमध्ये ती शक्ती अमर्याद असते. - एलिजा डिसोजा, अध्यक्ष मच्छी व्यवसायात ‘कभी खुशी कभी गम’बाजारपेठेमध्ये मच्छी घेण्यासाठी दररोज ग्राहकांची गर्दी असतेच असे नाही. काहीवेळा तर ग्राहकांची वर्दळ कमी असल्याने नुकसान सहन करून व्यवसाय करावा लागतो. काहीवेळा खरेदी केलेल्या मालापेक्षा कमी दरात वस्तंूची विक्री करावी लागते. अशावेळी तोट्यालाही सामोरे जाऊन व्यवसाय करावा लागतो.