शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात चाळीस टक्के दुचाकीस्वारांकडे हेल्मेट

By admin | Updated: July 28, 2016 00:59 IST

शासनाची दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती : अजूनही सव्वा दोन लाख हेल्मेटची आवश्यकता; सक्तीपेक्षा जिवाचे मोल ओळखण्याची गरज

गिरीष परब-सिंधुदुर्गनगरी --राज्य शासनाने हेल्मेट सक्ती केल्यामुळे दुचाकीस्वार व त्याच्यासोबत बसणाऱ्या अशा दोघांनाही हेल्मेट वापरणे बंधनकारक बनले आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात एक लाख ४० हजार दुचाकींची संख्या असून, शासन निर्णयानुसार जिल्ह्यात २ लाख ८० हेल्मेटची गरज आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार दुचाकी संख्येच्या ४० टक्के म्हणजे ५६ हजार दुचाकीस्वार हेल्मेट वापरत आहेत. उर्वरित २ लाख २४ हजार हेल्मेटची आवश्यकता सिंधुदुर्गातील मोटारसायकलस्वार व त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला भासणार आहे. शासन निर्णयानुयार सिंधुदुर्गातही हेल्मेट सक्तीचे होणार आहे. पण या सक्तीपेक्षाही जीव मोलाचा म्हणून स्वेच्छेने हेल्मेट वापरणे काळाची गरज बनली आहे. दुचाकीस्वारांनी याचे भान ठेवून काळजी घेतली तर आगामी काळात अगदी अत्यल्प दिवसात जिल्ह्यातील दुचाकीस्वारांकडे हेल्मेट प्राप्त होऊन हेल्मेटसक्ती आवाक्यात येऊ शकते. दिवसागणिक वाहनांची वाढती संख्या आणि वाहनचालकांच्या बेपर्वाईमुळे वारंवार होणारे अपघात यामुळे सर्रास डोक्याला इजा पोहोचून दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे. याशिवाय अशा अपघातातील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या अपघातांना आळा घालावा म्हणून दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसणाऱ्या दोघांनाही सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीच हेल्मेट सक्ती (फेबु्रवारी २०१६) करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाची बहुतांशी जिल्ह्यांमध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी होताना दिसून येत नव्हती. याचे गांभीर्य ओळखून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मोटारसायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यापुढे दुचाकीवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घातले नसेल, तर त्यांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही, असा निर्णय २१ जुलै रोजी विधानसभेत घेतला. शासनाच्या या निर्णयाचे राज्यभरात मोटारचालक व राजकारणी मंत्र्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. तर काहींनी राज्यशासन आमच्यावर हेल्मेटसक्ती लादू शकत नसल्याच्या भावना व्यक्त केल्या. मात्र, खरे पाहता आपल्या सर्वांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. सिंधुुदुर्गात रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची संख्याही दिवसागणिक वाढत चालली आहे. जिल्ह्याचा आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक लाख ४० हजार एवढी मोटारसायकलची संख्या आहे. शासन आदेशानुसार प्रत्येक दुचाकीच्या मागे दोन हेल्मेटची आवश्यकता लक्षात घेता सिंधुदुर्गाला २ लाख ८० हजार हेल्मेटची आवश्यकता आहे. मात्र, उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात केवळ दुचाकी संख्येच्या ४० टक्के, म्हणजेच ५६ हजार दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करतात. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, २ लाख २४ हजार दुचाकीस्वार व त्याच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीकडे सद्यस्थितीत हेल्मेट उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होत आहे.