शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

नोकरीच्या आमिषाने चाळीस लाखाला गंडा

By admin | Updated: September 4, 2016 00:27 IST

११ जणांची फसवणूक : रत्नागिरीतील ठकसेनाला अटक

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरी लावतो, असे सांगून रत्नागिरीतील एका तरुणाने कोल्हापूरमधील अकराजणांना ४० लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला आहे. हे अकराजण एकमेकांचे नातेवाईक आहेत. फसवणूक करणाऱ्या परितोष मधुकर बिर्ला (रा. बोर्डिंग रोड, माळनाका, रत्नागिरी) याला अटक करण्यात आली आहे.नोकरीचे आमीष दाखविताना परितोष बिर्ला याने जिल्हा परिषदेचे खोटे शिक्केही तयार केले असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.कापशी (ता. शाहूवाडी, कोल्हापूर) येथील बेबीताई अशोक गोपणे यांची परितोष बिर्ला याच्याशी ओळख झाली होती. अधूनमधून दूरध्वनीवरूनही त्यांचे परितोषशी संभाषण होत असे. १ जून ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत परितोष बिर्ला हा नेहमी त्यांना फोन करीत होता. आपली जिल्हा परिषदेमध्ये चांगली ओळख आहे. तुमच्या मुलीला जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात नोकरीला लावतो, असे परितोषने सांगितले. त्यासाठी जिल्हा परिषदेचे बनावट शिक्के तयार करून त्याने काही खोटी नियुक्ती पत्रे तयार केली होती. त्याच शिक्क्यांच्या आधारे त्याने मुलाखतीची पत्रेही हाती दिली होती. परितोषशी झालेले आपले संभाषण आणि त्याने दाखविलेले नोकरीचे आमीष याबाबत त्यांनी आपल्या नातेवाइकांशी चर्चा केली. बेबीताई गोपण यांनी मुलाखतीचे पत्र मिळाल्यानंतर दोन लाख ४0 हजार रुपये परितोषला दिले. आपल्या मुलाला नोकरी लागावी, यासाठी बेबीतार्इंच्या नातेवाइकांनीही पैसे देण्याची तयारी दर्शविली. त्यांनाही परितोषने नोकरीचे आमीष दाखविले.आपल्या मुलाच्या नोकरीसाठी म्हणून कोल्हापूरमधीलच किरसिद्ध बडगर यांनी चार लाख रुपये, सुजाता गोपणे यांनी तीन लाख ४० हजार रुपये, गणेश गोपणे यांनी दोन लाख रुपये, घनश्याम जमादार यांनी दोन लाख ५० हजार रुपये, शुखला मोहिते यांनी तीन लाख ५० हजार रुपये, उमाकुमार माने यांनी चार लाख रुपये, प्रकाश पाटील यांनी तीन लाख रुपये, चव्हाण यांनी एक लाख रुपये, भूषण गडकरी यांनी तीन लाख रुपये, अभिषेक जरात यांनी सहा लाख रुपये असे ११ जणांनी ४० लाख ४० हजार रुपये परितोषला दिले होते. पत्रे मिळूनही मात्र अजूनही नोकरीचा कसलाच पत्ता नसल्याने बेबीताई गोपण यांनी परितोष याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी परितोषला अटक केली आहे. (वार्ताहर)फसवणुकीचे वाढते प्रमाणशहरात फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. विजया लक्ष्मी बचत ठेव प्रकरण उघड होऊन काही दिवस उलटले असतानाच, पुन्हा एकदा फसवणुकीचा गुन्हा उघड झाला आहे.