शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

शिवरायांच्या किल्ल्यांचे संवर्धन झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2016 00:21 IST

रघुजीराजे आंग्रे : हर्णैत जयभवानी प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती कार्यक्रम

दापोली : शिवरायांचा खरा इतिहास म्हणजे त्यांच्या पराक्रमांची साक्ष देणारे ३५० गड किल्ले आहेत. हा इतिहास सध्या ‘ढासळत’ आहे. अरबी समुद्रात होणारे शिवरायांचे भव्य स्मारक पाहिल्यावर कुणा परदेशी व्यक्तीला त्यांचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा झाली, तर त्यांना दाखवण्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडूजी होणे गरजेचे असल्याचे मत सरखेल कान्होजी आंग्रे यांचे ९वे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी हर्णै येथे बोलताना व्यक्त केले.हर्णै येथील जयभवानी प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला आले असता ते बोलत होते. ते म्हणाले की, कोकणशी आमची नाळ जोडली गेली आहे. आपण नेहमी येथील गड - किल्ल्यांना भेटी देत असतो. त्यातून आपणाला पूर्वजांना भेटल्याचा आनंद मिळतो. सध्या अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे वारे वाहात आहेत. शिवाजी महाराजांचे स्मारक हे भव्यच असायला पाहिजे. महाराष्ट्र काही गरीब राज्य नाही, हे सध्या उघड होणाऱ्या घोटाळ्यांच्या आकड्यांवर लक्ष टाकल्यास सहज लक्षात येते. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवरायांच्या स्मारकाचे दर्शन घेतल्यावर एखाद्या परदेशी अभ्यासकाला शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहण्याची इच्छा झाली व त्याने शिवरायांनी बांधलेले किल्ले पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना काय किल्ल्यांचे पडलेले दगड दाखवणार? त्यांच्याकरिता तरी शिवरायांच्या किल्ल्यांची डागडुजी होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.याबाबत ते म्हणाले की, सर्व काही सरकार करेल, या भ्रमात कुणी राहू नये. आपल्याला याकरिता काय करता येईल, याचा विचार करावा. सध्या प्रत्येक किल्ल्यात दारूच्या फोडून टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिकच्या बाटल्या, कुरकुऱ्यांची पाकिटे, सिगारेटची थोटूके असा बराच ऐवज पडलेला आपल्याला आढळून येतो. ज्या गावात किल्ला आहे, त्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन दीड ते दोन महिन्यांनी एकदा किल्ल्यातून चक्कर मारली व श्रमदान केले, तर हा किल्ला सहज स्वच्छ होईल. किल्ल्यांमधील वाढलेली झाडी साफ होईल, किल्ल्यात राबता वाढेल. तसेच कुणीतरी येऊन साफसफाई करतंय असं समजल्यावर गावात थोडा दबाव निर्माण होईल व अस्वच्छतेचं प्रमाण कमी होईल. यातून पर्यटकांची संख्या वाढेल आणि रोजगार निर्मितीही होईल, अशी आशा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. सोमनाथ पुन्हा बांधलं जातं, तर रायगडाचीदेखील पुनर्बांधणी होणे गरजेचे आहे, अशी मागणी आपण करणार आहोत.(प्रतिनिधी)कोकणात अजूनही आपूलकी शिल्लकआपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने दैनंदिन जीवनात काही वेगळेपणा अनुभवास येतो का? लोकांचा दृष्टीकोन कसा असतो? याबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण कान्होजी आंग्रे यांचे वंशज असल्याने आपणाला गर्व वाटतो. आपल्या पूर्वजांची ही कर्मभूमी असल्याने आपण नेहमी कोकणात येतो. एसएससी झाल्यावर आपण सायकलवरून कुलाबा ते सिंंधुदुर्ग अशी सायकल भ्रमंती केली होती. कोकणात अजून आपूलकी शिल्लक आहे, असेही ते म्हणाले.किल्ल्यांची डागडुजी होणे आवश्यक : आंग्रे.आंग्रे घराण्याची कोकणशी नाळ.गड, किल्ल्यांच्या भेटीतून पूर्वजांना भेटल्याचा आनंद ; रघुजीराजे आंग्रे यांचे प्रतिपादन.