शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाअभावी निधीची वनविभागाकडून उधळपट्टी; गरज नसताना आंबोली घाटात संरक्षक कठडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2022 15:14 IST

सावंतवाडी : संकेश्वर बांदा महामार्गचा आराखडा पूर्ण होऊन आंबोली पर्यंतच्या मार्गाला निधी ही केंद्रिय रस्ते महामार्ग विभागाने मंजुर केला ...

सावंतवाडी : संकेश्वर बांदा महामार्गचा आराखडा पूर्ण होऊन आंबोली पर्यंतच्या मार्गाला निधी ही केंद्रिय रस्ते महामार्ग विभागाने मंजुर केला असतनाच दुसरीकडे मात्र वनविभागाकडून  देवसू पासून आंबोली घाट मार्गावर संरक्षक कठडे उभारण्याच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे संरक्षक कठडे कोणाच्या तरी नजरेत येऊ नयेत म्हणून रस्त्या पासून आत मध्ये दोनशे मीटर घेतले असून हा चर्चेचा विषय बनला आहे. मात्र या सर्व प्रकारावर वनविभागाचे अधिकारी सारवा सारव करीत असून अद्याप महामार्गा बाबत माहिती नसल्याचे सांगत आहेत.

केंद्र सरकारकडून संकेश्वर बांदा हा नवा महामार्ग करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.या महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आराखडा ही तयार करण्यात आला असून बांधकाम विभागाकडून हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग ही करण्यात आला आहे या महामार्गाचा जो आराखडा निश्चित करण्यात आला आहे या आराखड्या प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, आजारा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, माडखोल, सावंतवाडी, इन्सुली, बांदा  मार्गावरून हा रस्ता निश्चित करण्यात आले आहे.

मात्र हा मार्ग निश्चित झाला असतानाच दुसरीकडे मात्र वनविभागाकडून आंबोली घाट मार्गावर रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे उभारणाऱ्याचे निश्चित करण्यात आले असून यासाठी नियोजन विभागाकडून निधी ही मजूर करण्यात आला आहे.मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत हा निधी मंजूर करून घेण्यात आला आहे.तसेच काहि संरक्षक कठडे ही गेल्या वर्षी उभारण्यात आले असून त्यानंतर  तक्रारी झाल्यानंतर या कठड्याचे काम थांबविण्यात आले होते.मात्र या वर्षी पुन्हा काम सुरू करण्यात आले असून कामाबाबत तक्रारी होऊ नये तसेच आलेला निधी खर्च व्हावा म्हणून वनविभागाकडून नामीशक्कल लढविण्यात आली असून हे कठडे मुख्य मार्गा पासून तब्बल दोनशे मीटर आत मध्ये रस्त्यावरून कुणाला दिसणार नाहीत अशा ठिकाणी उभारण्यात आले आहेत त्यामुळे वन विभागाला नेमके हे कपडे कशासाठी हवे होते असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. 

तसेच हे संरक्षक कठडे उभारताना संबंधित ठेकेदाराने वरच्यावर उभारल्याने हे कठडे भर पावसात केव्हाही कोसळू शकतात त्यामुळे हे कामही निकृष्ट दर्जाचे असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता वन विभागाचे अधिकारी कानावर हात घेत आहेत तर आंबोलीतील काही ग्रामस्थांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे ही तक्रारी केल्या आहेत.महामार्ग होत असेल संरक्षक कठडे कशासाठीसंकेश्वर बांदा हा महामार्ग आंबोली घाटातून जात असेल तर नियोजन विभागाचा पैसा खर्च करून हे संरक्षक कठडे कशासाठी उभारण्यात येत आहेत की पैशाची ही उधळपट्टी सुरू आहे एक तर करू ना काळात कोणत्याही विकासकामांना निधी मिळत नसताना असे पैसे खर्च करून शासन कशासाठी खर्च करत आहे असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.